आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कोणत्या परिस्थीत तुम्ही काढू शकता तुमच्या PF चे पैसे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क- कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन सुविधेचा लाभ पाच कोटींपेक्षा जास्त लोकांना मिळत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अॅप्लिकेशन फाइल केल्यानंतर पीएफ ट्रांसफर करणे ते पीएफचे पैसे काढण्यापर्यंतची सगळी प्रक्रीया 3 दिवसांत पूर्ण होते. ज्यांचे पीएफ व बँक खाते आधार नंबरसोबत जोडलेले आहे ते सगळे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 
 
कधी आणि कीती काढू शकता PF
 
पीएफचे पैसे एमरजेंसी परिस्थीत काढू शकता. 7 परिस्थितिंमध्ये काढू शकता पीएफचे पैसे. काही परिस्थितिंमध्ये पूर्ण पैसे काढू शकता आणि काही परिस्थीत ठरावीक रक्कम काढू शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या 7 परिस्थीत ज्यात तुम्हाला पैसे काढता येतील.
 
1- मेडिकल ट्रीटमेंट-
 
> तुम्ही तुमच्यासाठी, पत्नी, मुले, आई-वडील यांच्या आजारपणासाठी पैसे विद्ड्रॉ करी शकता.
> यासाठी एक महीना किंवा त्यापेक्षा जास्त रूग्णालयात भर्ती झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
> पीएफच्या पैशाने मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी त्या व्याक्तीला आपले इंप्लॉयर किंवा ईएसआयचे अप्रूव्हड सर्टिफिकेट द्यावे लागेल
> या अंतर्गत पीएफे पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 मध्ये अर्ज करण्यासोबतच आजारपणाचे सर्टिफिकेट द्यावे लागेल.
> मेडिकल ट्रीटमेंटसाठी तुम्ही पगारच्या 6 पट किंवा पूर्ण पैसे काढू शकता.
 
2- एजुकेशन/लग्न-
 
> तुमच्या, भाऊ-बहिण किंवा मुलांच्या लग्नासाठी पूर्ण पैसे काढू शकता.
> तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठीही पैसे काढू शकता.
> यासाठी कमीत कमी सात वर्ष नोकरी करायला हवी.
> एजुकेशनसाठी तुम्हाला फॉर्म 31 मधून अर्ज करावा लागेल. यात तुम्हाला 50 टक्केच पीएफ मिळतो.
> एजुकेशन के लिए पीएफ का इस्तेमाल कोई भी व्यक्ति अपने पूरे सेवाकाल में सिर्फ तीन बार कर सकता है.
 
3- प्‍लॉट/घऱ खरेदी करण्यासाठी
 
> प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष नोकरी केली असावी.
> प्‍लॉट तुमच्या, तुमच्या पत्नीच्या किंवा दोघांच्या नावावर रजिस्‍टर्ड असायला हवा.
> प्लॉट खरेदी करण्यासाठी पीएफमधून 24 टक्के रक्कमच काढू शकता, तर घरासाठी 36 टक्के काढू शकता.
 
5- रि-पेमेंट ऑफ होम लोन
 
यासाठी तुम्हाला 10 वर्ष नोकरी केलेली असावी. यात तुम्हाला 36 टक्के रक्कम काढू शकता.
 
6- हाउस रिनोव्हेशन
 
यासाठी तुम्हाला 5 वर्ष नोकरी केलेली असावी. तुम्ही फक्त 15 टक्के रक्कमच काढू शकता.
 
7- प्री-रिटायरमेंट
 
यासाठी तुमचे वय 54 असायला हवे. यात तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधून 90 टक्के रक्कम काढू शकता, हे विद्ड्रॉ तुम्ही फक्त एकदाच करू शकता.
 
 
पाच वर्षात सगळ्यात कमी आहे सध्याचा EPF रेट
 
वर्ष EPF व्याज दर PPF       व्याज दर
2013-    14 8.75 टक्के 8.7 टक्के
2014-    15 8.75 टक्के 8.7 टक्के
2015-    16 8.80 टक्के      8.7 टक्के
2016-    17 8.65 टक्के 8.1 टक्के
2017-    18 8.55 टक्के 7.6 टक्के

बातम्या आणखी आहेत...