Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | know which food not eat in rainy season

पावसाळ्यात खाऊ नका चायनीज फूड 

रिलिजन डेस्क, | Update - Jul 14, 2019, 12:15 AM IST

जर आपल्याला सटर-पटर खाण्याची सवय असली तरी पावसाळ्यात आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार होऊ शकतात.

 • know which food not eat in rainy season

  जर आपल्याला सटर-पटर खाण्याची सवय असली तरी पावसाळ्यात आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार होऊ शकतात. म्हणून या गोष्टींपासून लांब राहा.


  भजी : पावसाचे थेंब आले की गरमागरम भजी आणि चहा आठवतो. तेलात तळलेली भजी पचवण्यासाठी कठीण असतात ज्याने आपले पोट खराब होऊ शकते म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळा.


  चाट : चटकारे घेऊन चाट खायला कोणाला आवडत नाही. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्याला लागणाऱ्या चाटच्या गाड्या आकर्षित करतात, पण हे बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाट्यांमुळे आजारपण


  पाणी पुरी : या दिवसांमध्ये पाणी पुरी मुळीच खाऊ नये. यात वापरण्यात येणाऱ्या पाण्यात भरपूर जिवाणू असतात. ज्याने आपल्याला उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे रोग होऊ शकतात.


  चायनीज फूड : रस्त्याचा बाजूला लागणारे चायनीज फूडच्या गाड्यांवर स्वस्त डिश सर्व्ह करत असले तरी ते नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असते. यात घातले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि वेगवेगळे सॉस आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.


  फळांचा रस : ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी या दिवसांत फळे लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळा आणि आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नका. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.

Trending