Worldcup2019 / जाणून घ्या नेमक्या कोण आहेत या 'मिस्ट्री आजी'? विराट आणि रोहितने घेतला आशीर्वाद, व्हिडिओ झाला व्हायरल

कॅमेऱ्यामध्ये अनेकवेळा या आजींना दाखवण्यात आले होते

दिव्य मराठी वेब

Jul 03,2019 12:30:52 PM IST

लंडन- बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात मंगळवारी भारताने बांग्लादेशला पराभूत करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली. या संपूर्ण सामन्यादरम्यान अनेकवेळा कॅमेऱ्याची नजर एका आजीवर पडत होती. कॅमेरात अनेक वेळा त्यांना दाखवले जात होते. काही वेळातच त्या आजी इंटरनेटवर व्हायरल झाल्या. सामना संपल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने त्या आजींची भेट घेतली. त्यानंतर त्या आजी नेमक्या कोण आहेत, हा प्रश्न सगळ्यांना पडला. या 87 वर्षीय आजी अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमच्या समर्थक आहेत. त्या अनेकवेळा भारताचा सामना पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्या आजीचे नाव चारुलता पटेल आहे. उपकर्णधार रोहित शर्मानेही त्या आजीची भेट घेतली.


बांग्लादेश-भारताचा मंगळवारी बर्मिंघमच्या एजबेस्‍टन मैदानात खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान एक असे दृष्य समोर आले, ज्याने संपूर्ण जगाची मने जिंकली. हे दृष्य भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी गेलेल्या आजीचे आहे. सामन्या नंतर विराटने त्यांची भेट घेतली आणि ट्विटरवर लिहीले, 'आमच्या सगळ्या समर्थकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी त्यांचे आणि खासकरून चारुलता पटेलजी यांचे धन्यवाद. त्या 87 वर्षांच्या आहेत आणि सगळ्यात भावूकही आहेत.'

विराट आणि रोहित शर्माने सामन्यानंतर त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्या प्रेमाने विराटच्या डोक्यावरून हा फिरवत आहेत आणि विराट त्यांच्या व्हिलचेअरजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मारत आहे. शिवाय त्यांनी विराट आणि रोहितच्या गालावार प्रेमाने मुकाही घेतला. मैदानातून बाहेर आल्यावर चारुलता यांनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छाही दिल्या.

भारताने बांग्लादेशला 28 रनाने पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. टॉस जिंकून फलंदाजी करताना सलामिवीर रोहित शर्माचे शतक (104 रन) आणि केएल राहुलच्या अर्धशतक(77) मदतीने 50 ओवरमध्ये 9 बाद 314 असा विशाल स्कोर भारताने बांग्लादेशला दिला होता. त्याचा पाठलाग करताना 48 व्या ओवरमध्ये 286 रन काढून बांग्लादेशचा संपूर्ण संघ बाद झाला.

X
COMMENT