Home | Gossip | Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om

11 Years of Om Shanti Om: दीपिकावर नाखुश होती फराह खान, हे होते कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:30 AM IST

बॅडमिंटन खेळाडू असताना दीपिका अभिनेत्री होण्याचे उराशी बाळगत होती.

 • Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om

  मुंबईः फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या रिलीजला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. 9 नोव्हेंबर 2007 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि या चित्रपटातून एक देखणी अभिनेत्री बॉलिवूडला लाभली. 'शांती', 'मस्तानी', 'पद्मावती' म्हणून इंडस्ट्रीत ती लोकप्रिय झाली. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याविषयी. दीपिकाने या चित्रपटातून इंडस्ट्रीत यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिने या संधीचे सोन करत स्वतःचे वेगळे स्थान इंडस्ट्रीत निर्माण केले. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केले. फॅशन गुरु प्रसाद बिडाप यांना दीपिकाला मॉडेलिंग क्षेत्रात आणण्याचे श्रेय जाते. प्रसाद हे स्वतः एक प्रसिद्ध कोरिओग्राफर, स्टायलिस्ट, फॅशन जर्मालिस्ट, उद्यमी आणि सोशलाइट आहेत. दीपिकासोबतच त्यांनी अनुष्का शर्मा आणि लारा दत्तालासुध्दा मॉडेलिंगमध्ये खूप मदत केली.


  गुरु प्रसाद यांनी आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या दीपिकाविषयीची अनेक किस्से शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले, की बॅडमिंटन खेळाडू असताना दीपिका अभिनेत्री होण्याचे उराशी बाळगत होती.


  'ओम शांती ओम'मध्ये दीपिकावर नाखुश होती दिग्दर्शिका फराह खान...
  दीपिका आणि फराह खानने अलीकडेच, 'हॅपी न्यू इअर'मध्ये एकत्र काम केले. परंतु खूप कमी लोकांना ठाऊक आहे, फराह दीपिकाच्या 'ओम शांती ओम' या पहिल्या सिनेमावेळी तिच्यावर नाराज होती. प्रसाद यांच्या सांगण्यानुसार, फराहने आपल्या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिकाची निवड केली होती. परंतु तिच्याकडे पाहून फराहला वाटले, की ही चांगला अभिनय, डान्स आणि चांगली हिंदी बोलू शकत. परंतु जेव्हा तिने स्क्रिन टेस्टदरम्यान दीपिकाला स्क्रिनवर पाहिले तेव्हा तिचा दीपिकाविषयीचा दृष्टीकोन बदलला. प्रसाद यांच्यानुसार, दीपिकाला ऑनस्क्रिन पाहिल्यानंतर आपल्या सिनेमांत हिच अभिनेत्री घेण्याचा निश्चय केला.


  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा फॅशन गूरु प्रसाद बिडापा यांनी सांगितले, दीपिकाशी संबंधित काही रंजक गोष्टी...

 • Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om

  फायटिंगपासून ते हॉर्स रायडिंगपर्यंत, अभिनेत्री होण्यासाठी दीपिकाने घेतली एक वर्ष मेहनत

  दीपिकाने फराहच्या कमेन्टला केवळ मनावरच नव्हे तर डोक्यातही घेतले. तिने फराहचे म्हणणे, आव्हानासारखे स्वीकारले. दीपिकाने स्वत:ला या चित्रपटासाठी तयार करण्यासाठी पूर्ण एक वर्षांचा कालावधी घेतला. प्रसाद यांनी सांगितले, दीपिकाने एक वर्ष मेहनत केली आणि प्रशिक्षण घेतले. प्रत्येक गोष्ट तिने मन लावून केली. हिंदी बोलण्यापासून ते डान्सिंगपर्यंत दीपिका सर्वच गोष्टीत निपूण झाली. त्या काळात तिने फायटींग आणि हॉर्स रायडिंगचेसुध्दा ट्रेनिंग घेतले होते. एक चांगला कलाकार होण्यासाठी जेवढे करावे लागते दीपिकाने ते सर्वकाही केले. याचे चित्र तिच्या पहिल्या सिनेमातसुध्दा दिसले.

 • Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om

  दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांची इच्छा होती, 'ऑल इंडिया बॅडमिंटन चॅम्पिअन व्हावे'

   'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'गलियों की रासलीला-रामलीला', 'बाजीराव मस्तानी' या सह अनेक गाजलेल्या सिनेमांमधून दीपिका फिल्म इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री बनली. परंतु तिच्या वडिलांची इच्छा होती, की दीपिकाने बॅडमिंटन खेळाडू व्हावे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन खेळाडू होते. याविषयी प्रसाद सांगतात, 'जेव्हा मी पहिल्यांदा दीपिकाला भेटलो, तेव्हा ती खूप फिट आणि सुंदर दिसत होती. तसेच, तिचे आई-वडील प्रकाश आणि उज्ज्वला हेदेखील तिला पाठिंबा देणारे होते. त्यांनी नेहमी दीपिकाला प्रत्येक कामात साथ दिली. शालेय दिवसांत दीपिका बॅडमिंटन खेळाडू होती आणि नॅशनल टूर्नामेंट्स खेळली आहे. तरीदेखील तिचा कल मॉडेलिंगकडे होता. प्रकाश नेहमी आपल्या दोन्ही मुलींना साथ देताना दिसतात. त्यांनी नेहमी मुलींना स्वातंत्र दिले आणि करिअर निवडण्याची अधिकारसुध्दा. दोन वर्षे बंगळुरुमध्ये मॉडेलिंगचे काम करणारी दीपिका नंतर मुंबईला शिफ्ट झाली.'

 • Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om


  एकेकाळी मुंबईमध्ये एकटी होती दीपिका-
  2010 आणि 2011 हा काळ दीपिकासाठी अतिशय वेगळा ठरला.  तिचे काही सिनेमे (लफंगे-परिंदे, खेले हम जी जान से आणि आणखी काही) फ्लॉप झाले. यावेळी तिच्या आणि रणबीर कपूरच्या नातेसुध्दा दुरावा निर्माण झाला होता. हा काळ दीपिकासाठी खूपच वाईट ठरला. मुंबईमध्ये स्वत:ला स्थापित करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी दीपिकाला हा काळ वाईट गेला. परंतु तिने आपल्या अपयशाला मनावर घेतले आणि जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली. तिने आपल्या चुकांमधून शिकवण घेतली आणि पुढे पाऊल टाकत राहिली. आज तिने यशोशिखर गाठले आहे.  येत्या 14 नोव्हेंबर रोजी ती अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध होणार आहे. 

Trending