Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | know your internal organs by face

चेहऱ्यावर ही लक्षणे आढळल्यास समजून जा की, तुमच्या शरीरात काहीतरी गडबड आहे....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 05, 2018, 06:24 PM IST

जाणून घ्या चेहऱ्यांवरील बदलांमुळे कशा प्रकारे शरीरातील आजारांची माहिती मिळते.

 • know your internal organs by face

  हेल्थ डेस्क- आपले शरीर हे अनेक अवयव मिळून बनले आहे. आपल्याला शरीराच्या वरून होणारे आजार दिसतात पण या आजारांचे मुळ हे शरिराच्या आत असते. उदाहरणार्थ जर आपल्या पोटात दुखत असेल तर आत गडबड असल्याचे कळते, आपल्यावा खोकला आला तर आपला गळा खराब असल्याचे कळते त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यांवरील बदलांमुळे आपल्या शरीराच्या आत काय सुरू आहे हे आपल्याला कळत असते. चेहऱ्यावरील पींपल्स, डाग, चट्टे, ब्लॅकहेड्स हे आपल्या शरीरात हार्मोनल इंबँलेस असल्याचे सांगते. आपल्या शरीरतील प्रत्येक भाग एकमेकांशी जोडलेला असतो, आणि त्यामुळेच सध्याच्या काळात अॅक्यू प्रेशर थेरेपीमुळे मोठे मोठे आजार दूर केले जातात.

  - पींपल्स, डाग, काळेपणा, बारीक दाणे, तेलकट त्वचा, सुरकुत्या, आणि इतर अॅसर्जींना एक प्रकारच्या संकेताच्या रूपात पाहतात. यामुळे किडनी, फुफूसे, शरीरातील टॉक्सीक, मेंदूचे विकार, आतड्याचे विकार, शरीरतील साखरेचे प्रणाण, कोलेस्ट्रॉल, युरिक अॅसिड इत्यांदी समस्यांची माहिती मिळते, आणि त्यांच्यावर उपाय करता येतो.

  जाणून घ्या चेहऱ्यांवरील बदलांमुळे कशा प्रकारे शरीरातील आजारांची माहिती मिळते.

  1- कपाळ
  - कपाळाच्या वरील भागावर पींपल्स येणे हे किडनीमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे.
  - कपाळ लाल होणे हे जास्ती दारू, चहा, कॉफी, पिल्याचे लक्षण आहे.
  - कपाळावर पांढरे डाग येणे हे जास्ती दुध किंवा डेअरी प्रोडक्सचा जास्ती वापर केल्यामुळे होते.
  - कपाळाच्या मधला भाग लाल होणे हे जास्त गोड खाल्यामुळे किंवा टेंशन घेतल्यामुळे होते.
  - कपाळाच्या खालच्या भागावर पींपल्स येणे हे जास्त ताण, कमी रक्ताभिसरण आणि अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे.
  - त्यासोबतच केसांमध्ये जास्त केमिकल्स किंवा तेलाचा जास्त वापर केल्यास कपाळावर पोमेड अॅक्ने तयार होतात.

  2- नाक
  - भुवयाच्या मधला भाग हा लिव्हर आणि पीत्ताशयाशी जोडलेला असतो.
  - भुवयाच्यामध्ये दोन उभ्या रेषा येत असतील तर ते लिव्हरमध्ये फॅट आणि कफचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.
  - आपले नाक शरीरातील नाडी, रक्त धमन्या आणि ह्रदयाशी जोडलेला असतो.
  - आपल्या नाकावर मोठ्या आकाराचे पींपल्स येणे हे ह्रदयात आणि रक्तामध्ये अशुद्धता असल्याचे लक्षण आहे.
  - त्यासोबतच जास्त चहा, कॉफी, दारू गुटखा यांच्या सेवनाने नाकावर पींपल्स येतात.
  - नाक लाल होणे आणि सुज येणे हे कफचे प्रमान वाढल्याचे तसेच लिव्हरमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे.

  3- डोळे
  - डोळ्याखाली काळे डाग येणे किंवा डोळे लाल होणे किंवा डोळ्यावर सुज येणे हे लिव्हरमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे.
  - त्यासोबतच असंतुलित आहारामुळे डोळ्यावरील त्वचेवर सुज येते.

  4- कान
  - किडनीमध्ये समस्या असल्यास कानावर मोठे पींपल्स येतात त्यासोबतच कान लाल होतात.

  5- गाल
  - गालावर पींपल्स येणे हे फुफूसातील गडबडी, रक्ताभिसरणात समस्या आणि पचनात अडथळा याचे लक्षण आहेत.
  - त्यासोबतच गाल बारीक होणे हे शरीरा प्रोटिनची कमतरता असल्याचे लक्षण आहे.
  - महिलांमध्ये गालावर बारिक केस येतात, ते रिप्रोडक्टीव्ह सिस्टीममध्ये गडबड असल्याचे लक्षण आहे.

  6- ओठ
  - ओठ लाल किंवा गुलाबी असल्यास किडनी चांगल्या प्रकारे काम करत आहे ह समजावे.
  - जर किडनीत काही समस्या असेल तर ओठ काळे पडणे ते कोरडे पडणे किंवा त्यांच्यात भेगा पडणे ही लक्षणे दिसून येतात.

Trending