आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानाची चोच, चर्चेचे पंजे, विश्लेषणाचे बॉम्ब आणि आपण..!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुज खरे 

आजकाल लोक सोशल मीडियावर प्रत्येक मुद्याबाबत ज्या पद्धतीने ज्ञान झाडत आहेत, ते पाहून मी घाबराघुबरा झालो आहे. लोकांकडे भीषण माहिती आहे. लहान- लहान गोष्टींवर खूप खोलात जावून फेकून मारण्यासाठी विश्लेषणाचे बॉम्ब आहेत. प्रत्येक मुद्यावर भयावह पद्धतीने पसरवण्यासाठी चर्चेचे पंजे आहेत. गिधाडाप्रमाणे लचके तोडण्यासाठी आयत्या ज्ञानाच्या चोची आहेत. फक्त नाही, ती याशिवाय असलेल्या आयुष्याची मजा! त्यांच्या विना असलेली सहजपणाची मस्ती! अज्ञानातील सुखाची चमक! गुरु, खरे तर हा विचार उलटा जरूर आहे, पण तो भयंकर चिंतनाची मागणी करतोय. आता कितीही दूर जा, सोशल मीडियावरील माहितीच्या सामग्रीवर डोकं आपटल्याशिवाय राहत नाही. एन्सायक्लोपीडिया झालेली व्यक्तिमत्व तुडवून पुढे जात आहेत. फक्त असा भाबडा माणूस मिळत नाही, ज्याला काही नवे सांगितल्यावर आश्चर्याने आ वासलेल्या आणि डोळे मोठे केलेल्या इमोजीची मजा घेऊ शकेल.

सोशल मीडियावर फक्त शहाणेच शिल्लक राहिलेत? शेवटी सगळे अडाणी गेले कुठं? मॅच संपल्यावर बघा; टीम इंडिया का हरली, रोहित का खराब खेळला, हे एखादा तुम्हाला इतक्या बारकाईने सांगेल, की त्यानंतर तुम्हाला त्या खेळाडूचा व्यक्तिगत स्तरावर तिरस्कार वाटू लागेल. सगळीकडे ज्ञानाचं अजीर्ण झाल्याचं दिसून येतंय. हे अजीर्णच त्रासाचं मूळ कारण आहे, हेच कुणी सांगत नाही. पूर्वी आयुष्य सुलभ होतं. नाती सरळ होती. लालसाही एका मर्यादेपलीकडे लालसी नव्हती. आता ज्ञान वाढले आहे. संकटे वाढली आहेत. पण, सर्व दिशांनी फेकण्यात येत असलेले ज्ञान आनंद देण्यात कमी पडते आहे. मेंदू माहितीची स्टोअर रुम बनत चाललाय. अज्ञानासोबत प्रश्न विचारण्याची उमेद तरी असते. दुसरीकडे, माहितीचा हेतूच मार्ग काढण्यात अडसर बनतो. माहिती असणे आणि विश्लेषणाची क्षमता असणे यातील बारीक अंतर बुद्धिमत्तेचा गैरसमज निर्माण करते. अज्ञानीपण सुलभता आणते. बुद्धिमत्ता वेगळेपणाचा भाव निर्माण करते.असे म्हणतात, की आपल्याला काही जाणून घ्यायचेय, तर अज्ञानी बना. अज्ञानीपणात तुम्ही रिकामी घागर असता, ज्यात कोणत्याही प्रकारचे ज्ञान भरता येईल. इथे तर ज्ञानाच्या नावाने अव्यावहारिक माहितीही मेंदूत भरली जातेय. हक्कानी गटाची सगळी माहिती आहे, सीरियाबाबत पेंटॅगॉनपेक्षा माहिती बाळगून आहे, पण मैत्रीसाठी फेसबुक नव्हे, तर हृदय हवे, याचे 'नॉलेज' नाही. एखादी जखम झाल्यास जगभरातल्या डॉक्टरांचे नंबर तयार आहेत, परंतु घरातल्या आईने सांगितलेल्या दुध-हळदीवर 'बिलिव्ह' करु शकत नाही. तुम्हाला यात अधिक काही वाटत नसेल, तर शुद्ध अज्ञान कधीही बरे. किमान ते अापले स्वत:चे तरी आहे..!

अनुज खरे फिचर हेड, दैनिक भास्कर
 

बातम्या आणखी आहेत...