आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमबहुल भागात जनसंपर्कासह समस्यांची जाण असलेल्या उमेदवारांचा नगरसेवक होण्याचा मार्ग सोपा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 धुळे - शहरातील मुस्लिमबहुल ऐंशीफुटी राेड, वडजाई राेड परिसराचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये होतो. या प्रभागात ९५ टक्के मतदार मुस्लिम समाजाचे अाहेत. त्यामुळे या प्रभागातून मुस्लिम समाजाचा नगरसेवक निवडून येणार हे निश्चित अाहे. प्रभागातील एका जागेवर समाजवादी पार्टीच्या फातमा नुरूलअमीन अन्सारी यांची बिनविराेध निवड झाली आहे. अन्य तीन जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात अाहेत. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असले तरी त्यांच्यासमाेर समाजवादी पार्टी अाणि राष्ट्रीय समाज पक्षांच्या उमेदवारांचे अाव्हान अाहे. मात्र, या प्रभागात ज्या उमेदवाराचा जनसंपर्क चंागला व ज्या उमेदवाराला समस्यांची जाण आहे त्याची लढाई सोपी असेल. राष्ट्रवादीला या प्रभागातील लढत एकतर्फी वाटत असली तरी समाजवादी व रासपमुळे तिरंगी लढत हाेण्याची शक्यता अाहे. एका जागेवर मुस्लिम लिगनेही उमेदवार दिला आहे. 

 

प्रभाग क्रमांक बाराला गजानन काॅलनी, अरिहंत मंगल कार्यालयापुढील नाल्यापासून सुरुवात हाेते. वडजाई राेड, ऐंशीफुटी राेड तिरंगा चाैकापर्यंत येणारा भाग या प्रभागात येताे. प्रभागात पाॅवरलूम असल्याने कामगारांची वसाहत या भागात मोठ्या प्रमाणावर अाहेे. संपूर्ण परिसर मुस्लिमबहुल असून, १४ हजार ७८० मतदार प्रभागात अाहेत. त्यातील ९५ टक्केपेक्षा अधिक मतदार मुस्लिम समाजाचे अाहेत. पाच टक्के मतदारांमध्ये इतर समाजातील मतदारांचा समावेश हाेताे. या प्रभागात गेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र, त्यांच्याकडून फारशी प्रभावी कामे न झाल्याने पक्षाबद्दल काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत मतदारांनी नाकारलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगली संधी आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नवाब बेग यांचा प्रभागात प्रभाव असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात अाहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीकडूनही राष्ट्रवादीला

फाइट देण्याची तयारी चालवण्यात आली अाहे. 

 

प्रभागातील चारपैकी एक जागा छाननीअंती बिनविराेध झाली अाहे. त्यामुळे केवळ तीन जागांसाठी निवडणूक हाेत अाहे. त्यात ब गटातील सर्वसाधारण महिलेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या शेख शाहजानबी बिस्मिल्ला अाणि समाजवादी पार्टीच्या नारुन्निसा अकबुल अली जुलाह, राष्ट्रीय समाज पक्षाच्या सकिना हबीब कुरेशी यांच्यात तिरंगी लढत अाहे. तसेच प्रभागातील क जागेसाठी राष्ट्रवादीचे माजी उपसभापती तथा नगरसेविकेचे पुतणे मुख्तार कासिम मन्सुरी रिंगणात अाहेत. त्यांच्याविरुद्ध समाजवादी पार्टीचे नगरसेवक सय्यद साबीर अली माेतेबर अाहेत. दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. याशिवाय शेख इमरान रफियाेद्दीन, मुख्तार अ.अब्दुल हमीद अन्सारी हे दाेघे अपक्षही िरंगणात अाहेत. प्रभागातील ड जागेसाठी विद्यमान नगरसेवक अमीन अब्दुल करीम पटेल हे पुन्हा रिंगणात अाहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नवाब बेग मिर्झा यांचा मुलगा शाेएब नवाब बेग मिर्झा, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ताैसिफ शब्बीर खाटीक रिंगणात अाहेत. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत हाेईल. ताैसिफ खाटीक हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांना किती मताधिक्य िमळते यावर समाजवादी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार अाहे.

 

याच प्रभागातून इंडियन युनियन मुस्लिम लिगतर्फे सलीम एेनुद्दीन शाह हे निवडणूक लढवत आहेत. तसेच शेख जैद शमीम अहमद, कलिम निजामुद्दीन अन्सारी हे दाेन अपक्ष उमेदवार स्पर्धेत अाहेत. मात्र, त्यांचा फारसा जनसंपर्क नाही. ते प्रचारातही अद्याप कुठेही दिसून अालेले नाही. राष्ट्रवादी व समाजवादी पार्टीसाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार अाहे. त्यामुळे चांगला जनसंपर्क,परिसराची माहिती व जाण असलेल्या उमेदवाराला मतदारांकडून अधिक प्राधान्य दिले जाईल असे चित्र अाहे. 

 

नागरिकांच्या अपेक्षा… 
रस्त्याचे काम ठप्प... 

प्रभागातील रस्त्यांची समस्या गंभीर अाहे. गजानन काॅलनीच्या नाल्यापासून थेट वडजाई राेडपर्यंत असलेल्या मुख्य डीपी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले अाहे. रस्त्यावर सर्वत्र खडी पडलेली अाहे. वाहनामुळे खडी उडून नागरिकांना दुखापत हाेते. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे, त्याचबरोबर परिसरात स्वच्छता माेहीम राबवण्यात यावी. वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. -अख्तरुन्निसा माेहंमद सलीम,नागरिक 
 

सभागृहाची निर्मिती व्हावी... 

प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे अादींच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. प्रभागात गाेरगरीब नागरिक माेठ्या प्रमाणावर राहतात. दुसरीकडे मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणींना ताेंड द्यावे लागते. परिसरात मुलांसाठी जिमची साेय करावी. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न व्हावे. प्रभागातील नागरिकांना लहान मोठा कार्यक्रम करता यावा, यासाठी सामाजिक सभागृहाची निर्मिती करावी. - शकिलाेद्दीन बशिराेद्दीन, नागरिक 

 

वडजाई राेडचा मुद्दा प्रचारात ठरू शकताे महत्त्वाचा... 
गेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून वडजाई राेडच्या समस्येचा मुद्दा हाताळत निवडणूक लढविली गेली हाेती. रस्त्याच्या कामालाही सुरुवात झालेली अाहे. मात्र काही महिन्यांपासून रस्त्याचे काम अर्धवट थांबलेले अाहे. काम हाेत नसल्याने परिसरातील नागरिकांना माेठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत अाहे. या रस्त्याच्या कामावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही काही प्रमाणावर मतभेद असल्याने यंदाच्या निवडणुकीत रस्त्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकताे. 

 

अशी आहे प्रभागातील स्थिती... 
दवाखान्यासह उद्यानाचा विकास... 

प्रभागातील नंदीराेडवर महापालिकेच्या माध्यमातून नव्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात अाली अाहे. परिसरात माेठ्या संख्येने श्रमजीवी नागरिक राहतात. ते शासकीय रुग्णालयात उपचार घेतात. जिल्हा रुग्णालय चक्करबर्डी परिसरात गेल्यापासून येथील नागरिकांची गैरसाेय हाेत हाेती. मात्र या भागात महापालिकेने रुग्णालय उभारल्याने नागरिकांची साेय झाली अाहे. याशिवाय सार्वजनिक हाॅस्पिटलच्या मागील बाजूस उद्यान विकसित करण्यात अाले अाहे. तसेच सार्वजनिक शाैचालय, जलवाहिनी, पथदिव्यांची कामे करण्यात आली आहेत. 

 

अस्वच्छतेचे अागार… 
प्रभागात दाट वस्ती अाहे. स्वच्छतेबाबत या प्रभागात बोंबाबाेंब अाहे. गटारी, नाल्यात माेठ्या प्रमाणावर घाण साचली आहे. नियमित स्वच्छताही परिसरात हाेत नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी येते. त्याचप्रमाणे अतिक्रमणाचीही समस्या माेठी अाहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली अाहे. घंटागाडीही येत नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. या समस्येकडे लाेकप्रतिनिधीही फारसे लक्ष देत नाही. त्याचबरोबर वरखेडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले अाहे. परिसरात काही माेठ्या अाकाराचे नाले अाहेत. त्यात मांसाचे तुकडेही फेकले जातात. त्यातून काही वेळेस तणावाचीही स्थिती निर्माण हाेत असते. 

बातम्या आणखी आहेत...