आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Koala Stopped A Cycle And Drank A Bottle Of Water, In Australia 30 Per Cent Of Koala Burned In Forest Fire.

सायकलस्वाराला राेखून कोआलाने प्यायले त्याच्या बाटलीतील पाणी, जंगलाच्या आगीत 30 टक्के काेआला भाजलेेे

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीचा वणवा भडकला आहे. ही आग दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये २५,००० हेक्टरवर पसरली आहे. आतापर्यंत १,००० घरे जळून खाक झाली आहेत. त्याच वेळी जंगलात राहणारे १००० कोआल (प्राण्यांची एक प्रजाती) मरण पावले आहेत. जंगलात पसरलेल्या या आगीतून वाचलेला एक कोआला एका दुचाकीस्वाराकडे मदतीसाठी गेला व त्यांच्या बाटलीतून पाणी प्यायला. सायकलस्वार अॅना ह्यूसलरने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले की, ताे सायकलीवरून नाॅर्टन समिट येथून अॅडिलेड जात हाेता. त्याच वेळी समाेररून काेआला आला व त्याला थांबवून त्याच्या बाटलीतले पाणी पिऊ लागला. त्या वेळी तेथे ४० अंशापेक्षा जास्त तपमान हाेते. ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरणमंत्र्यांनी एका विधानात सांगितले की, न्यू साऊथ वेल्समध्ये जवळपास ३० टक्के काेआला आगीच्या तडाख्यात सापडले आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन कसाेशीने प्रयत्न करत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...