• Home
  • News
  • Koena Mitra Slams Batla House's Makers For Messy Recreation Of Saki Saki song's new version

Song Recreation / 'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले

निखिल आडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाउस' 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 
 

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 12:07:00 PM IST

बॉलीवूड डेस्क - 'बाटला हाउस' या आगामी चित्रपटातील 'ओ साकी साकी' हे आयटम साँग रिलीज झाले आहे. 2004 मध्ये आलेल्या 'मुसाफिर' चित्रपटातील गाण्याचे री-क्रिएट व्हर्जन आहे. 'मुसाफिर' चित्रपटातील गाण्याला विशाल-शेखर यांनी संगीत दिले होते तर सुनीदी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी गायले होते. संजय दत्तवर चित्रीत केलेल्या या गाण्यावर कोइना मित्राने डान्स केला होता. पण साकी साकी गाण्याचे नवीन व्हर्जन कोइनाच्या पसंतीस पडले नाही. तिने ट्विटरवर मेकर्स विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

कोइनाने लिहिले - गाण्याचे वाटोळे केले
कोइनाने ट्वीटमध्ये लिहिले की, 'मुसाफिर मधील साकी हे माझे गाणे री-क्रिएट केले आहे. जुन्यात गाण्यात सुनीधी चौहान, सुखविंदर सिंग आणि विशाल-शेखर यांचे संयोजन उत्तम होते. पण नवीन व्हर्जन मला आवडले नाही. जुन्या गाण्याचे वाटोळे केले आहे. जुन्या गाण्याने अनेक ब्लॉकबस्टर्स क्रॅश केले होते.'

तनिष्क बागचीचे री-क्रिएट केले गाण्याचे संगीत
तनिष्क बागचीने बाटला हाउससाठी गाण्याचे संगीत री-क्रिएट केले आहे. त्यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर नेहा कक्करसोबत तुलसी कुमार आणि बी.प्राक यांनी आवाज दिला. नोरा फतेहीसोबत जॉन अब्राहम देखील या गाण्यात दिसत आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

X
COMMENT