आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोडचुक: चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी होती टॉपची मॉडेल, एका चुकीने केले उद्धवस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: तुम्हाला कोएना मित्रा आठवते का?  'मुसाफिर', 'एक खिलाड़ी एक हसीना', 'अपना सपना मनी मनी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली सुपरमॉडल आणि अभिनेत्री. चित्रपट जगतात आल्यानंतर तिचे करिअर चांगले सुरु होते, परंतु एका चुकीच्या निर्णयाने सर्व काही उद्धवस्त केले. कोइनाने आपली प्लास्टिक सर्जरी केली परंतु चांगले दिसण्याऐवजी ती खराब दिसू लागली. सर्जरीनंतर तिचे नाक फुगले. डॉक्टरांनीही हात वर केले. एका मुलाखतीत कोएनाने सांगितले होते की, या काळात तिला तिच्या मित्रांनीही दूर केले होते. नंतर अनेक सर्जरी करुन कोएनाचे नाक थोडे ठिक होऊ शकले. परंतु तोपर्यंत तिच्या करिअरचे खुप नुकसान झालेले होते. आज कोएना अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे. छोट्या-मोठ्या फंक्शनमध्ये ती कधी-कधीच दिसते. गेल्या महिन्यातच कोएना मुंबईच्या एका स्टोर लाँचवर पोहोचली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...