आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता निसंकोच मलायकाची स्तुती करतोय अर्जुन कपूर, रिलेशनशिपमध्ये का पडला याचे कारणही सांगितले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 'कॉफी विद करण' सीजन 6 मध्ये यावेळी बहिण-भाऊ म्हणजे अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर सहभागी झाले होते. शोमध्ये जान्हवीने आपल्या आयुष्यातील अनेक खुलासे केले, अर्जुन कपूरही आपल्या पर्सनल आयुष्याविषयी बोलला. शोच्या रॅपिड फायर राउंडमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना अर्जुनने मलायकाचे नाव घेतले. करणने प्रश्न केला की, जर तुला सेक्सी साँग करण्याची इच्छा असेल तर मलायका-कतरिनामधून कुणाला निवडशील?" यावर अर्जुनने मलायकाचे नाव घेतले. यावर अर्जुनने स्पष्टीकरण दिले की, मलायकाने देशातील सर्वात पहिले सेक्सी साँग केले होते. मलायकानेच छैया-छैंया... गाण्यासोबत सेक्सी आयटम नंबर इंट्रोड्यूज केले होते. यामुळे मी मलायकाचे नाव घेतले. 

 

रिलेशनशिपमध्ये जाण्याची गरज का पडली? 
या शोमध्ये अर्जुनने तो सिंगल नसल्याचे मान्य केले. तो लग्न करण्यास तयार असल्याचेही तो म्हणाला. अर्जुनने आपल्या इमोशनल हेल्थवर खुलून चर्चा केली. तो म्हणाला- "गेल्या 6 महिन्यांपासून माझ्या आयुष्यात काही बदल आले आहेत. काही नवीन लोक माझ्या आयुष्यात आले आहेत. मला माझे आयुष्य स्टेबल करायचे आहे. मला एका चांगल्या मित्राची गरज आहे. असा मित्र ज्यामुळे मला स्थिरता मिळेल."

 

रणबीर कपूरने केले ब्रेकअप 
शो दरम्यान अर्जुनने आपल्या ब्रेकअपची कहाणीही ऐकवली. त्याने सांगितले की, रणबीर कपूरच्या सल्ल्याने मी ब्रेकअप केले होते. त्याने मुलीचे नाव सांगितले नाही. अर्जुनने सांगितले की, "एकदा मी आणि रणबीर बालकनीमध्ये उभे होतो. तेव्हा रणबीर मला म्हणाला की, तु जर रिलेशनशिपने आनंदी नसशील तर सोडून दे आणि पुढे जा. त्याच्या सल्ल्याने मी पुढच्या क्षणीच मुलीला मॅसेज पाठवला आणि आमचे ब्रेकअप झाले. काही दिवसांनंतर मला पाश्चाताप झाला पण तोपर्यंत खुप काही पुढे गेले होते. तो म्हणाला की, यानंतर रणबीरकडून रिलेशनशिपविषयी कधीच सल्ला घेणार नाही."
 

बातम्या आणखी आहेत...