Home | Sports | From The Field | Kohali is the Best in Test; Got top possition in batting

टेस्टमध्ये काेहलीच बेस्ट; गावसकरला टाकले मागे; फलंदाजीत गाठले अव्वलस्थान

वृत्तसंस्था | Update - Aug 06, 2018, 08:29 AM IST

काेहलीने एकाच कसाेटीत रँकिंगचा डबल धमाका उडवला. त्याने इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात शानदार शतक झळकावले.

 • Kohali is the Best in Test; Got top possition in batting

  दुबई- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने एकाच कसाेटीत रँकिंगचा डबल धमाका उडवला. त्याने इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात शानदार शतक झळकावले. त्याचे हे इंग्लंडच्या खेळपट्टीवरचे पहिले शतक ठरले. यासह ताे कसाेटीत क्रमवारीत जगातील नंबर वन फलंदाज बनला अाहे. त्याने करिअरमध्ये सर्वाेत्तम ९३४ गुणांची कमाई केली. त्याने सलामीच्या कसाेटीत एकूण २०० धावा काढल्या. त्याने अाॅस्ट्रेलियाच्या स्मिथवर कुरघाेडी करून अव्वल स्थान गाठले.


  अाॅलटाइममध्ये वरचढ

  काेहली हा अाॅलटाइम रेटिंग गुणांत १४ व्या स्थानी अाला. त्याने यामध्ये ९३४ गुण संपादन केले. यातून त्याने सुनील गावसकरला (९१६) मागे टाकले. ब्रॅडमॅन ९६१ गुणांसह अव्वलस्थानी कायम अाहेत.


  सातवा भारतीय
  कसाेटीच्या जागतिक क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन गाठणारा काेहली हा सातवा भारतीय फलंदाज ठरला. यासह त्याने हा पल्ला यशस्वीपणे गाठला. यात सचिनसह (२०११), वीरेंद्र सेहवाग (२०१०), गाैतम गंभीर (२००९), राहुल द्रविड (२००६), सुनील गावसकर (१९८७) अाणि दिलीप वेंगसरकर (१९८५) यांनी हे स्थान गाठले हाेते.

Trending