Home | Sports | From The Field | Kohli grab number one spot in ICC Test batting ranking by overtaking Steve Smith of Australia

ICC टेस्ट रँकिंगमध्ये कोहली अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाचा स्मिथला पछाडत मिळवले स्थान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 05, 2018, 12:46 PM IST

कोहलीच्या पूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकर, द्रविड, गंभीर, सुनील गावस्कर, सेहवाग आणि वेंगसरकर यांनी ही कामगिरी केली आहे.

  • Kohli grab number one spot in ICC Test batting ranking by overtaking Steve Smith of Australia

    स्पोर्ट्स डेस्क - बर्मिंघममध्ये इंग्लंडविरोधातील पहिल्याच कसोटीत पराभव झाल्याने भारतीय संघाबरोबरच क्रिकेट चाहत्यांचीही मोठी निराशा झाली आहे. पण ही निराशा काहीशी दूर करणारी एक बातमी आली आहे. ती म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटाकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.


    विराट कोहलीने इंग्लंड विरोधातील पहिल्या कसोटीत पहिल्या डावामध्ये 149 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावातही त्यानेच भारताकडून सर्वाधिक 51 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर कोहलीने स्टिव्ह स्मिथला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. कोहलीच्या पूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर या भारतीय फलंदाजांनाच ही कामगिरी करता आलेली आहे.


    पराभवाने निराश कोहली
    इंग्लंड विरोधातील पहिल्या कसोटीमध्ये पराभव झाल्याने कोहली काहीसा निराश झाल्याचे दिसून आले. कोहलीला जेव्हा त्याच्या 149 धावांच्या खेळीबाबत विचारले तेव्हा कोहली म्हणाला की, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ध्येयाचा पाठलाग करत असता, तेव्हा या गोष्टींना फारसे महत्त्व राहत नाही. कोहलीच्या प्रयत्नांनंतरही भारतीय संघाला पहिली कसोटी वाचवता आली नाही. दोन्ही डावांत कोहलीने एका बाजुने किल्ला लढवला पण त्याला दुसऱ्या बाजुने साथच मिळाली नव्हती.

Trending