आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली तिन्ही फाॅरमॅटच्या टाॅप-10 स्थान मिळवणारा एकमेव फलंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली टी-२० क्रमवारीत दहाव्या स्थानी पोहोचला. कोहलीने विंडीज विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत १८३ च्या सरासरीने १८३ धावा काढल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने पाच स्थानांनी झेप घेत दहावे स्थान गाठले. कोहली कसोटी व वनडेमध्ये नंबर वन आहे. सध्या तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल दहात स्थान मिळवणारा एकमेव फलंदाज बनला. लोकेश राहुल ३ स्थानी उसळी घेत सहाव्या क्रमांकावर आला. राहुलने मालिकेत ५५ च्या सरासरीने १६४ धावा काढल्या. दोन अर्धशतके ठोकली. रोहितने अर्धशतक झळकावले. त्याची एका स्थानाने घसरण होत, तो नवव्या स्थानी पोहोचला.

टॉप-5 फलंदाज : बाबर अव्वल
 

फलंदाज : संघ : गुण


बाबर आझम : पाक : 879
एरोन फिंच : ऑस्ट्रेलिया : 810
डेविड मलान : इंग्लंड : 782
कोलिन मुनरो : न्यूझीलंड : 780
ग्लेन मॅक्सवेल : ऑस्ट्रेलिया : 766

टॉप-5 गाेलंदाज : राशिद अव्वल

गाेलंदाज : देश : गुण
राशिद खान : अफगाणिस्तान : 749
मुजीब उर रहमान : अफगाणिस्तान : 742
मिचेल सेंटनर : न्यूझीलंड : 698
इमाद वसीम : पाकिस्तान : 681
अॅडम झंम्पा : ऑस्ट्रेलिया : 674
 

बातम्या आणखी आहेत...