आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहली, लाेकेश, राेहितचा झंझावात; टीम इंडियाचा विंडीजवर मालिका विजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ४ गड्यांनी विजयी, काेहली सामनावीर, राेहित शर्मा मालिकावीर

कटक- कर्णधार विराट काेहली (८५), राेहित शर्मा (६३)अाणि लाेकेश राहुल (७७) यांच्या झंझावाताच्या बळावर टीम इंडियाने रविवारी विंडीज संघावर मालिका विजयाची नाेंेद केली. भारताने  तिसऱ्या अाणि निर्णायक वनडे सामन्यात विंडीजवर चार गड्यांनी मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली.  विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून  भारतीय संघासमाेर विजयासाठी ३१६ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले.


प्रत्युत्तरात भारतीय संघाने सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे टार्गेट गाठले. भारताच्या विजयात अाघाडीच्या तीन फलंदाजांचे माेलाचे याेगदान राहिले. त्यांनी तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतकाच्या अाधारे विजयाचा मजबुत  पाया रचला. त्यानंतर अाॅल राऊंडर रवींद्र जडेजा (३९) अाणि शार्दूल  ठाकूरने (१७) नाबाद खेळी करताना भारतीय  संघाचा विजय निश्चित केला. विराट काेहली सामनावीर अाणि राेहित  शर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 
 

 ६७ डावांत तीन हजार धावा पूर्ण, रिचर्ड््सवर मात   विंडीजच्या सलामीवीर शाई हाेपने शानदार ४२ धावांची खेळी केली. मात्र, त्याचा अर्धशतकाचा प्रयत्न अपुरा ठरला. यादरम्यान ३५ धावा केल्यानंतर त्याने वेगवान ३ हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने ६७ डावांत हा पराक्रम गाजवला. यासह त्याने अापल्याच देशाच्या महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड््स यांना यामध्ये मागे टाकले.     विंडीज                                   धावा   चेंडू लेव्हिस झे. नवदीप गाे. जडेजा    २१    ५०     शाई हाेप त्रि.गाे.शमी                  ४२    ५०     राेस्टन चासे त्रि.गाे. नवदीप         ३८    ४८     हेटमेयर झे. कुलदीप गाे. नवदीप  ३७    ३३     पुरन झे. जडेजा गाे. शार्दुल          ८९    ६४     केराॅन पाेलार्ड नाबाद                   ७४    ५१     जेसन हाेल्डर नाबाद                   ०७    ०४     अवांतर : ०७ . एकूण : ५० षटकांत ५ बाद ३१५ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-५७, २-७०, ३-१३२, ४-१४४, ५-२७९. गाेलंदाजी :  शार्दुल ठाकूर १०-०-६६-१, माे. शमी १०-२-६६-१, नवदीप सैनी १०-०-५८-२, कुलदीप यादव १०-०-६७-०, रवींद्र जडेजा १०-०५४-१.


भारत         
                           धावा  चेंडू
राेहित शर्मा झे.हाेप गाे. हाेल्डर    ६३    ६३    
लाेकेश झे. हाेप गाे. जाेसेफ         ७७    ८९    
विराट काेहली त्रि.गाे. किमाे पाॅल  ८५    ८१    
श्रेयस झे.जाेसेफ गाे. किमाे पाॅल   ०७    ०७    
ऋषभ पंत त्रि.गाे. किमाे पाॅल      ०७    ०६    
केदार जाधव त्रि.गाे. काॅट्रेल        ०९    १०    
रवींद्र जडेजा नाबाद                 ३९    ३१    
शार्दूल ठाकूर नाबाद                १७    ०६    




अवांतर : १२ . एकूण : ४८.४ षटकांत ६ बाद ३१६ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१२२, २-१६७, ३-१८८, ४-२०१, ५-२२८, ६-२८६.  गाेलंदाजी :  शेल्डन काॅट्रेल १०-१-७४-१, जेसन हाेल्डर १०-०-६३-१, किमाे पाॅल ९.४-०-५९-३, राेस्टन चेस ४-०-१९-०, केरी पियरे ७-०-४६-०, अल्झारी जाेसेफ ८-०-५३-१.  

बातम्या आणखी आहेत...