आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Record विराट कोहलीने सर्वात कमी वनडे मध्ये 10 हजार रन करत सचिनचा विक्रम मोडला, ठोकले 37वे शतक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा कर्णधार विराट कोहलीने वन डे करिअरमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बुधवारी वेस्टइंडिजच्या विरोधात विशाखापट्टनममध्ये दुसऱ्या वन डे 81 धावा करताच त्याने या विक्रमावर नाव कोरले. कोहली 10 हजार धावा करणारा पाचवा भारतीय आणि जगातील 13वा फलंदाज आहे. विराटने सर्वात कमी म्हणजे 205 इनिंगमध्ये हा विक्रम केला.

 

यापूर्वी सर्वात कमी इनिंगमध्ये 10 हजार धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. त्याने 259 इनिंगमध्ये हा विक्रम रचला होता. याच मॅचमध्ये कोहलेनी शतकही केली. हे त्याचे 37वे वन डे शतक आहे. वेस्टइंडीजच्या विरोधात पहिल्या  वनडेतही कोहलीने 140 धावा केल्या होत्या. 


सर्वात कमी काळात पूर्ण केल्या 10 हजार धावा 
विराट डेब्यूनंतर सर्वात कमी काळात 10 हजार वनडे रन करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता. द्रविडने डेब्यूनंतर 10 वर्षे 317 दिवसांत 10 हजार रन पूर्ण केले होते. विराटने 18 ऑगस्ट 2008 ला वनडे डेब्यू केला होता. त्यानुसार त्याने 10 वर्षे 67 दिवसांत हा विक्रम रचला. विराटने 8000 आणि 9000 वनडे रनही सर्वात कमी इनिंग्जमध्ये पूर्ण केले होते. 


आतापर्यंत 13 फलंदाजांनी वनडेमध्ये 10,000 धावा केल्या आहेत. त्यात भारताचे पाच, श्रीलंकेचे चार तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्टइंडीजच्या प्रत्येकी एका फलंदाजाचा समावेश आहे. भारताकडून ही कामगिरी विराट, सचिन, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी आणि द्रविडच्या नावावर आहे. 

 

10000 वनडे रन करणाऱ्यांत भारतीय आघाडीवर 

फलंदाज देश  मॅच  इनिंग कोणाविरोधात डेब्यूनंतर किती दिवसांत
कोहली भारत 213 205 वेस्ट इंडिज 10 वर्षे 67 दिवस
सचिन भारत 266 259 ऑस्ट्रेलिया 11 वर्षे 103 दिवस
गांगुली भारत 272 263 श्रीलंका 13 वर्षे 204 दिवस
पाँटिंग ऑस्ट्रेलिया 272 266 द.अफ्रीका 12 वर्षे 37 दिवस
कॅलिस द. अफ्रीका 286 272 ऑस्ट्रेलिया 13 वर्षे 14 दिवस
धोनी  भारत 320 273 इंग्लंड 13 वर्षे 203 दिवस
लारा वेस्ट इंडिज 287 278 पाकिस्तान 16 वर्षे 37 दिवस
द्रविड  भारत 309 287 श्रीलंका 10 वर्षे 317 दिवस
दिलशान  श्रीलंका 319 293 पाकिस्तान 15 वर्षे 227 दिवस
संगकारा  श्रीलंका 315 296 ऑस्ट्रेलिया 11 वर्षे 227 दिवस
इंझमाम पाकिस्तान 322 299 भारत 12 वर्षे 302 दिवस
जयसूर्या श्रीलंका 337 328 भारत 15 वर्षे 226 दिवस
जयवर्धने श्रीलंका 355 333 पाकिस्तान 13 वर्षे 298 दिवस

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...