उत्सव / 13 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा, या तिथीला रात्री खीर खाण्याची आहे परंपरा

धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे...

Oct 12,2019 12:05:00 AM ISTरविवार, 13 ऑक्टोबरला अश्विन मासातील पौर्णिमा तिथी आहे. यालाच शरद पौर्णिमा तसेच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेचे महत्त्व अधिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे. यामुळे या तिथीला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. जाणून घ्या, या पूर्णिमेशी संबंधित खास गोष्टी


चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत
शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. याच कारणामुळे शरद पौर्णिमेला लोक घराच्या छतावर खीर ठेवतात ज्यामुळे चंद्राचे किरण त्या खिरेच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर खीर सेवन केली जाते.


खीरशी संबंधित खास गोष्टी
शरद पौर्णिमेच्या रात्रीचा वैज्ञानिक दृष्टीकोन पाहिल्यास हा काळ ऋतू परिवर्तनाच्या सुरुवातीचा असतो. या दिवसानंतर शीत (हिवाळा) ऋतुचे आगमन होते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करून खीर खाणे हे या गोष्टीचे प्रतिक आहे की, शीत ऋतूमध्ये गरम पदार्थांचे सेवन करावे कारण यामुळे आपल्याला जीवनदायिनी उर्जा प्राप्त होते.

X