आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा, या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 13 ऑक्टोबरला अश्विन मासातील पौर्णिमा तिथी आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा म्हणतात. उज्जैनचे ज्योतषाचार्य,  पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. येथे जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय... कोजागरी पौर्णिमेला घरात सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकावी. भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवावा. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून खाली दिलेल्या महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने 108 वेळेस जप करावा.

मंत्र - ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मयै नम:

- महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावी. खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्यावेळाने खीर प्रसाद स्वरुपात ग्रहण करावी. या उपायाने तुम्हाला मानसिक शांतात मिळेल तसेच आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल.

- शास्त्रानुसार कोजागरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्य प्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याचप्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे काहीकाळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. या उपायाने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. डोळ्यांसाठी लाभदायक जर तुमची डोळ्यांची शक्ती कमी झाली असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडावेळ चंद्राकडे पाहा. या उपायाने तुमच्या डोळ्यांची शक्ती वाढेल.

- कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी(चार वातींचा) दिवा लावावा. दिव्यामध्ये चारही वाती चार दिशांकडे असतील अशाप्रकारे दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ करावेत. हनुमान चालीसा माहिती नसल्यास श्रीराम जय राम जय जय राम हा जप करावा.

बातम्या आणखी आहेत...