आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकम सरबत एवढं 'खास' का आहे? जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊन्हाळा सुरू झाला की आजी बनवायची कैरीचं पन्हं किंवा कोकमचं सरबत. आजकाल इतर बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत, पण ती मजा काही औरच! आज आम्ही तुम्हाला कोकमचेच औषधी उपयोग सांगत आहोत...


कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, पण त्याबरोबरच हायड्रॉक्सिसिट्रिक अॅसिड नावाचा अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायक घटक असतो. तसेच मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी खनिजेही असतात. 


आयुर्वेदानुसार 'कोकम' ही अत्यंत उपयुक्त वनस्पती सांगितली आहे. आयुर्वेदामध्ये यास 'वृक्षाम्ला' किंवा 'फलाम्ला' असे नाव आहे. याचे फळ अत्यंत उपयुक्त वर्णिले आहे. मधुर, आम्लरसात्मक कोकम हे रुक्ष गुणात्मक असून पचनास जड असते. पचनानंतर हे आम्ल पाचक रसात परिवर्तित होते, असे आयुर्वेद सांगतो. कच्चे कोकम हे वात व पित्त दोषाचे निवारण करते, तर परिपक्व फळ हे कफ व वातदोषाचे निवारण करते. भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे, संग्राही (मलनिर्मितीस मदत करणे) ही कोकमची प्रमुख कार्ये आहेत. त्यामुळे पचनासंबंधी व्याधी, अतिसार, irritable bowel syndrome यात अत्यंत उपयुक्त ठरते. रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होतात. पचन चांगले होते. 


- यातील जीवनसत्त्वे व खनिजांमुळे गर्भिणीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे. 
- कोकम पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. 


- यातील अँटी फंगल व अँटिऑक्सिडंट हे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात. 
- इन्सुलिनचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते. 


- नवीन संशोधनावरून कोकम हे आंतरिक अल्सरमध्ये उपयुक्त ठरते हे समोर आले आहे. 
- कोलेस्टेरॉलचे प्रमाण कायम ठेवून हृदयाचे आरोग्य कायम ठेवते. कार्डिओ टॉनिक असते. 
- शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये असतो. 


- त्वचा व केसासाठी उत्तम असते 
- यातील हायड्रो-सायट्रिक अॅसिड हा घटक प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

बातम्या आणखी आहेत...