आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमस सणाला गालबोट; नाताळाच्या प्रार्थना सभेत हल्ला, 12 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड या गावात नाताळाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिश्चन नागरिकांवर मुखवटाधारी टोळीने हल्ला केला. यात १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


कर्नाटक सीमेवर असलेल्या या गावातील भीमसेन चव्हाण यांच्या घरी नाताळच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री प्रार्थना आयोजित केली होती. त्यात २०-२५ जण सहभागी झाले होते. तितक्यात तलवारी, रॉड व काचेच्या बाटल्या घेऊन १० ते १५ जणांचे मुखवटाधारी टोळके दुचाकीवरून तिथे पोहोचले. लागलीच त्यांनी प्रार्थनेत सहभागी लोकांवर दगडफेक करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरातील महिलांनी मोर्चा हाती घेत हल्लेखोरांवर मिरची पावडर फेकायला सुरुवात केली. त्यामुळे भेदरलेले हल्लेखोर पळून गेले. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मते, हल्लेखोर कर्नाटकच्या बेळगावीमधून आल्याचा संशय आहे. बेळगावीकडे पळून जात असतानाच तालगुली आणि डिंडलकोप या गावांतील काही लोकांवरही हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी त्यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...