Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

7 हजार वर्षे जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:02 AM IST

देवीचे रहस्यमयी मंदिर, विज्ञानाकडेही नाही उत्तर

 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  या मंदिरात अब्जावधीचा खजिना लपविण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

  कोल्हापूर- आम्ही तुम्हाला देवीच्या एका रहस्यमय मंदिराची माहिती देत आहोत. या रहस्याचे उत्तर विज्ञानाकडे देखील नाही. कोल्हापुरात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांची मोजदाद आजपर्यंत कोणीही करु शकलेले नाही.

  येथे लपविण्यात आलाय अब्जावधीचा खजाना
  -मंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही काही जण सांगतात. हा खजाना 3 वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे.
  - खजान्यात सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्याचा हार, सोन्याची साखळी, चांदीची तलवार, महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंघरू आणि हिऱ्याचे हार, मुगल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचा समावेश आहे.
  - इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाही, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी दान केले आहे.
  - मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली 10 दिवस खजिन्याची मोजदाद करण्यात येते.
  - खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिण्यांचा विमा काढण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराचा खजाना 1962 मध्ये उघडण्यात आला होता.

  1800 वर्ष जुने मंदिर
  - मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे.
  - शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली.
  - 27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती.

  नाही मोजता येत मंदिराचे खांब
  - मंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही.
  - मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही.
  मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानूसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या.
  - विज्ञान अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही.

  मंदिरात अजून काय आहे खास?
  - सांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते.
  - मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात.
  - या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे.
  - काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली.
  - काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती.
  - कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते.
  - दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते.

  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  हे कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर आहे.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  सणाच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी मंदिरास अशी रोषणाई करण्यात येते.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  मंदिराचे खांब आजपर्यंत कोणीही मोजू शकले नसल्याचा दावा मंदिर प्रशासनाकड़ून करण्यात येतो.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  देवीला परंपरेनुसार साडी घालण्यात येते.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  मंदिरात असलेली दीपमाळ.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  नवरात्र काळात येथे मोठी गर्दी असते.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  महालक्ष्मी मंदिर.
 • Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
  धुळवडीचा सणही येथे उत्साहात साजरा करण्यात येतो.

Trending