आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाशिवआघाडीचा पहिला विजय; शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या महापौराची निवड  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीभोवती फिरत आहे. राज्यात नवीन सरकार कधी स्थापन होणार हा प्रश्न कायम असताना कोल्हापुरात मात्र महासेनाआघाडीने पहिला विजय संपादित केला आहे. कारण कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या अॅड सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. .

लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला. त्या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या आहेत. दरम्यान महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीवेळी शिवसेनेच्या चार नगसेवकांची अनुपस्थिती होती. कोल्हापुरात गेल्या चार वर्षांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे.