आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी घेतली 'दिव्यमराठी' मतदान जागृतीची शपथ

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - यंदा गणेशोत्सवानंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका सर्वाधिक औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवात राजकीय फड रंगणार यात शंका नाही. मात्र, ज्या मतदारांच्या बळावर या निवडणुका होतात त्यांनीही सूज्ञ नागरिक म्हणून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठी 'दिव्य मराठी'ने 'मतदानाची प्रतिज्ञा' करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी 'दिव्यमराठी' मतदान जागृतीची शपथ घेतली.
 

डॉ. देवानंद शिंदे शपथ घेताना

 

दिव्य मराठीची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. माझ्यासारख्या बांधवांमुळे या देशात लोकशाही आहे. हा देश कोणत्याही नेत्याचा नाही. तो तुमचा आणि माझा आहे. या देशाची अंतिम सत्ता जनतेची आहे. मी मतदार असल्याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा हक्क मी बजावणार आहे. मी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा नाही. गणरायांच्या साक्षीने आम्ही प्रतिज्ञा करतो की या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारच. त्यातच माझे आणि माझ्या देशाचे सौख्य सामावलेले आहे. 
जय हिंद, जय महाराष्ट्र.

0