Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Kolhapur Youth Commits Suicide For Maratha Reservation

कोल्हापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा पहिला बळी, 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 07:45 AM IST

राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले असताना आत्महत्येचे सत्र काही थांबत नाहीत.

 • Kolhapur Youth Commits Suicide For Maratha Reservation

  कोल्हापूर - राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले असताना आत्महत्येचे सत्र काही थांबत नाहीत. कोल्हापूरच्या जागृती नगर येथे राहणारे 26 वर्षीय विनायक परशुराम गुदगी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा युवक आपल्या समाजाला आरक्षण मिळणार नाही या शंकेने अस्वस्थ होता. तसेच त्याचे वर्तन सुद्धा बदलले होते असे त्यांच्या बंधूंनी सांगितले आहे. विनायक मूळचे बेळगाव येथील दड्डी गावातील रहिवासी होते. त्यांचे मूळ शिक्षण मराठीत झाले होते. गावातच नोकरी सुद्धा सुरू होती. परंतु, कन्नड भाषा येत नसल्याने कोल्हापूरला शिफ्ट झाले होते. या युवकाच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा कोल्हापूरात पहिला बळी पडला अशा सोशल मीडिया पोस्ट होत आहेत. यावरूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोखून आपला रोष व्यक्त केला.

  परिसरात तणाव
  याबाबत सविस्तर माहिती अशी की विनायक यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तसेच कॉम्प्युटरचा कोर्स देखील केला होता. तरीही नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता. याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान भाऊ प्रवीणने विनायकला खाली उतरून उपचारासाठी तत्काळ छत्रपती प्रमिलराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच सकल मराठा समाजाच्या दसरा चौकात ठिय्या आंदोलनात असलेल्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा करण्यास अडवले. यावरून रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  माजी मुख्यमंत्र्यांचे ठिय्या आंदोलन...
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छत्रपती प्रमिलराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात जाऊन आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी सुद्धा रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. यानंतर दसरा चौक परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

 • Kolhapur Youth Commits Suicide For Maratha Reservation
 • Kolhapur Youth Commits Suicide For Maratha Reservation
 • Kolhapur Youth Commits Suicide For Maratha Reservation

Trending