आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही; संभाजीराजेंनी साधला विनोद तावडेंवर निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून पूरग्रस्तांसाठी मदत मागितली होती. यावर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी विनोद तावडेंवर निशाणा साधला.  
 

भाजपने केले होते मदत फेरीचे आयोजन 
कोल्हापूर - सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यासह देशभरातून मदत येत आहे. याच पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट रोजी भाजपने मुंबईत मदत फेरी काढली होती. या फेरीत मंत्री विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकांकडे मदत करण्याचे आवाहन केले होते. यावेळी जमा झालेला निधी आणि साहित्य मुख्यमंत्री सहायता निधीतून पूरग्रस्तांपर्यंत पाठवणार असल्याचे विनोद तावडे आणि गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. 

फेसबुकवर विनोद तावडेंचा व्हिडिओ अपलोड करून खासदार संभाजीराजे यांनी रोष व्यक्त केला
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे. असे संभाजीराजे म्हणाले.