आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताराचंद गवारिया
कोलकाता - यंदा नवरात्रीनिमित्त दुर्गा मंडपांच्या थीममध्ये देशभक्ती, सर्वधर्मसमभाव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्यापाराच्या जुन्या पद्धतींचे महत्त्वही दर्शवण्यात आले आहे. महिला सबलीकरण या थीमद्वारे महिलांना सन्मान देण्यात आला आहे. गुरुवारी नवरात्राच्या पाचव्या दिवशी सर्व मंडप लोकांसाठी खुले करण्यात आले. शहरात या अनोख्या थीमवर तयार झालेले भव्य मंडप पाहण्यासाठी लाखोच्या संख्येत लोक येत आहेत. मंडपांमध्ये या वेळी काय वेगळे आहे ते पाहू...
पांचजन्य : व्यापारिक नाव
७० कलावंतांनी ६ महिन्यांत बनवला, २०० वर्षे जुना कंदीलही
चलता बागान दुर्गा समितीने एक नौका बनवली आहे, तिचे नाव पांचजन्य ठेवले आहे. समितीचे अशोक जायसवाल यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी व्यापारासाठी अशा नौकांचा वापर होत होता. ७० कलाकारांनी ती ६ महिन्यांत तयार केली आहे. तीत २ टन पितळ, लाकूड वापरले आहे. आत २०० वर्षे जुना कंदीलही आहे. रात्री तिच्यावर प्रकाशाचे वेगवेगळे शेड दिसतात. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला आहे.
सर्जिकल स्ट्राइक : यंग बॉइज क्लब
४० फूट उंच मंडपात दहशतवाद्यांवर हल्ला करताना दिसताहेत अभिनंदन
बालाकोट एअर स्ट्राइक या थीमवरील ४० फूट उंच मंडपात सैनिक अतिरेक्यांवर हल्ला करताना दिसत आहेत. मध्ये अभिनंदन यांचा मोठा पुतळा आहे. क्लब प्रेसिडेंट विक्रांत सिंह यांनी सांगितले की, हे दृश्य जिवंत करण्यासाठी खास लाइट, साउंड इफेक्ट आहे.
सर्वधर्मसमभाव : मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारेही बनवले
बेलिया घाटा 33 पल्ली दुर्गा पूजा समितीने सर्वधर्म समभावाच्या थीमवर मंडप बनवला आहे. सचिव सुहाशीष म्हणाले की, मंडपात शेकडो मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे, चर्चची प्रतिकृती आहे. मंडपाबाहेर एका मोठ्या छत्रीखाली अनेक छत्र्या आहेत. प्रत्येक धर्माचे गाणे किंवा भजन ऐकवले जाते. देवीची मूर्ती १ टन धातूची आहे. ५० लाख रुपये खर्च झाला आहे.
मिशन चांद्रयान-२ : श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब
चांद्रयान-२ चा प्रवास लाइट इफेक्टद्वारे दाखवण्यात आला
श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने इस्रोच्या चांद्रयान-२ चे प्रकाशमय मॉडेल बनवले आहे. व्हीआयपी रोडच्या दोन्ही बाजूंना लाइट इफेक्टद्वारे चांद्रयान-२ चा चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रवास दाखवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.