आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉरर हाऊस: आईच्या मृतदेहासोबत 18 दिवस राहिला मुलगा, परिचित घरी आला म्हणून झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये अत्यंत खळबळजनक घटना उजेडात आली आहे. साल्ट लेक येथील रहिवासी 38 वर्षीय मैत्रेय भट्टाचार्य आपल्या 77 वर्षीय वृद्ध आईच्या मृतदेहासोबत 18 दिवसांपासून राहत होते. मैत्रेयने आपल्या एका परिचिताला घराच्या आत कबर खोदण्यासाठी रविवारी संध्याकाळी बोलावले तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. कोलकात्यात मागच्या 3 वर्षांत रॉबिन्सन स्ट्रीट, पाइकपारा आणि बेहला फ्रीजर केसनंतर ही चौथी घटना आहे.

 

असा झाला खुलासा...
परिचिताने पोलिसांना कॉल केला आणि यानंतर बिधाननगर नॉर्थ पोलिसांनी मैत्रेयच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी घरातील दृश्य पाहताच त्यांना धक्काच बसला. अंधाऱ्या रूममध्ये एका लाकडी कपाटात महिलेचा मृतदेह पडलेला होता. मृतदेहाला किडे लागलेले होते. दुसरीकडे, मैत्रेयचा दावा आहे की, तो मृतदेहाला दफन करण्यासाठी विशेष क्षणाची वाट पाहत होता.

 

सोमवारी संध्याकाळपर्यंत बिधाननगर पोलिसांना मैत्रेयच्या या विचित्र वागण्याचे कोणतेही स्पष्ट कारण मिळाले नव्हते. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, 'त्याला (मैत्रेय) अटक करण्यात आलेली नाही, असे दिसतेय की त्याला नातेवाईकही नाहीत. यामुळे तो पोलिस स्टेशनमध्येच थांबलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही एखाद्या मनोचिकित्सक आणि इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यावर काय उपचार करायचे हे ठरवू.' 

 

... 21 दिवस मृतदेह ठेवायचा होता
मैत्रेयने पोलिसांना सांगितले की, त्याची आई कृष्णा भट्टाचार्य यांचा 18 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, 'मी मृतदेहाला आणखी तीन दिवस ठेवू इच्छित होतो, मग 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला घरातच दफन केले असते.' तो म्हणाला की, हे रीतिरिवाजानुसार शुभ आहे, यावर त्याच्या आईचाही विश्वास होता.

 

मृत कृष्णा आपल्या नि़वृत्तीपर्यंत भवानीपुरमध्ये एका गर्ल्स स्कूलमध्ये शिकवत होत्या. त्यांचे वडील एका सरकारी हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये न्यूरोसर्जन होते. मैत्रेयने दावा केला की, तो सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना आपली पोस्ट ग्रॅज्युएशन मध्येच सोडावे लागले. डेप्युटी कमिश्नर अमित जवालगी म्हणाले, 'आम्ही अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहोत.' 

 

बातम्या आणखी आहेत...