आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जास्पद: हुंडा दिला नाही म्हणून भावजयीवर दिराने केला रेप, सासरच्या मंडळींना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता (प. बंगाल) - कोलकात्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे हुंड्याच्या लोभापायी नराधमांनी कथितरीत्या महिलेचा फक्त छळच केला नाही, तर पतीसहित कुटुंबातील इतरांनीही तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पीडितेचा पती आणि दिराला अटक...
कोलकात्याच्या बेलीगुंगे पार्कमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा कथितरीत्या रेप केल्याप्रकरणी पीडितेचा पती आणि तिच्या दिराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याची माहिती दिली. अधिकारी म्हणाले की, तक्रारकर्त्यानुसार, महिलेचा पती सुरंजन सेन याने बळजबरी तिच्यासोबत संबंध बनवले आणि दिरानेही सतत बलात्कार केला. त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

 

कुटुंबात भावांमध्ये पत्नीची अदलाबदली करण्याची प्रथा...
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने सासरच्या मंडळींनी सर्व प्रकार सांगितला तर त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणाले की, आमच्या कुटुंबात भावांमध्ये पत्नीची देवाण-घेवाण करण्याची प्रथा आहे. तथापि, आरोपीच्या एका नातेवाइकाने सांगितले की, त्यांच्यात घटस्फोटावरून वाद सुरू होता. यामुळे महिला दोन्ही भावांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...