• Home
  • National
  • Kolkata Police Commissioner Rajiv kumar to be questioned by CBI today

शारदा चिटफंड : / शारदा चिटफंड : कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार शिलाँगला पोहोचले, सीबीआय आज करणार चौकशी 

Feb 09,2019 12:05:00 PM IST

शिलाँग - सीबीआय आज कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची शिलाँगमध्ये चौकशी करणार आहेत. त्यांच्यावर शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. तपास संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजीव कुमार पश्चिम बंगाल कॅडरचे इतर तीन अधिकारी आणि त्यांच्या लहान भावासह शुक्रवारी सायंकाळीच कोलकात्यातून शिलाँगला पोहोचले आहेत.


अधिकाऱ्यांच्या मते, राजीव यांना कोणालाही भेटायची परवानगी नव्हती. सीबीआयचे नवे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी 6 फेब्रुवारीच्या आदेशात 10 अधिकाऱ्यांना 8 ते 20 फेब्रुवारीपर्यंत कोलाता आर्थिक गुन्हे शाखेशी संलग्न केले होते. आदेशात सर्व 10 अधिकाऱ्यांना कोलकात्यात सीबीआयच्या सहसंचालकांनी रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले होते.


दुसरीकडे राजीव कुमार यांच्या चौकशीच्या एकदिवस आधी शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयचे माजी प्रभारी प्रमुख नागेश्वर राव यांच्या कार्यालयांवर छापे मारले होते. पोलिसांनी ज्या दोन ठिकाणी छापे मारले त्यापैकरी एक कोलकात्यात तर दुसरे साल्ट लेक येथील अँजेला मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस आहे. ही कंपनी राव यांच्या पत्नीची असल्याची सांगितले जात आहे. राव यांनी ही कारवाई केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आली होती. कंपनीशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

X