आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - येथील एका ब्युटी पार्लरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात शनिवारी अधिकृतरित्या एफआयआर दाखल केला. तसेच महिलेच्या आरोपानुसार, या प्रकरणात 3 जणांना अटकही केली. कोलकाताच्या तिलजला परिसरातील एका ब्युटी पार्लरमध्ये घडली. सुरुवातीला आरोपींनी तरुणी बलात्कार करून घटनेचा व्हिडिओ तयार केला. त्याच व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी तिलजला परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये ती मेक-अपसाठी गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत मारहाण करून बलात्कार केला. यावेळी त्याचे दोन मित्र लपून व्हिडिओ बनवत होते. व्हिडिओ बनवल्यानंतर त्या दोघांनीही तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. तेव्हापासूनच व्हिडिओ दाखवून आणि ब्लॅकमेल करून ते तिघे तरुणीवर वारंवार अत्याचार करत होते. कित्येकवेळा त्यांनी व्हिडिओ बनवले आणि ते इंटरनेटवर टाकण्याच्या धमक्या दिल्या. अखेर शुक्रवारी तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर महिलेची वैद्यकीय चाचणी घेतली आणि बलात्काराची खात्री पटल्यानंतर एफआआयर दाखल करत तिन्ही आरोपींना जेरबंद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.