आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंढवा दुर्घटना : आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअर काळ्या यादीत, चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोंढवा दुर्घटनेप्रकरणी बिल्डर व अन्य संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली असून आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याची माहितीही पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. 


पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षण भिंत कोसळून झालेल्या अपघात प्रकरणाचा मुद्दा सोमवारी विधानसभेत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.


९ लाखांची मदत : या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांतील सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली असून एनडीआरएफकडून प्रत्येकी चार लाख, बांधकाम महामंडळातून प्रत्येकी ५ लाख तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...