आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील या ठिकाणी नेहमीच येतात एलियन्स, अनेक लोकांनी पाहिले आहे स्पेसशिप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलियन्सविषयी तुम्ही खुप काही ऐकले असेल, पण तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का? असे प्रश्न अनेक लोक आपल्याला विचारत असतात. नुकत्याच एका तरुणाने पीएमओंना पत्र लिहून सांगितले की, त्याने आपल्या घराच्या दारावर एलियन्स पाहिले, तो पृथ्वीविषयी माहिती आपल्या ग्राहाला पाठवत होता. पण नंतर समजले की, त्या व्यक्तीला मानसिक आजार होता. 

तुम्ही एलियन्स पाहिले नसतील. पण असे बोलले जाते की, भारतातील एका ठिकाणी नेहमीच दूस-या ग्रहावरील जीव येत जात असतात. येथील शेकडो लोकांनी हे पाहिले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणाविषयी सांगणार आहोत. 

 

खरेतर, कोंग्काला दर्राविषयी बोलले जाते की, येथे नेहमीच एलियन्स येत असतात. लद्दाखच्या 'कोंग्का ला' दर्राविषयी लोक म्हणतात की, येथे नेहमीच मोठ्या संख्येत एलियन्स येत जात असतात. त्यांचे स्पेसशिपही येथे दिसतात. येथील लोक म्हणतात की, जर तुम्हाला एलियन्स पाहायचे असतील, एकदा अवश्य येथे यावे.  येथे महिन्यातून अनेक वेळा एलियन्सचे शिप दिसतात असे बोलले जाते आणि अनेक लोकांनी याचे फोटोही घेतले आहेत. 

 

हे ठिकाण नेहमीपासूनच वैज्ञानिकांसाठी एक रहस्य आहे. येथील लोकही वेळोवेळी याविषयी माहिती देत असतात. त्यांनी यूएफओ पाहिल्याचेही ते सांगतात. हे एका बर्फाळ ठिकाणी आहे. येथे पोहोचणेही खुप अवघड असते. जे लोक येथे गेले आहेत, त्यामधील अनेक लोकांनी दावा केला आहे की, त्याने यूएफओ पाहिले आहे. गूगलनेही आपल्या सॅटेलाइटने या ठिकाणावरील काही रहस्यमयी अंतराळ यानाचे फोटो घेतले होते. या फोटोंमध्ये अंतराळ यानाचाही उल्लेख झाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...