आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेऊल - दक्षिण कोरियातील ह्योवोन हीलिंग सेंटर लोकांना मोफत अंत्यविधीचा अनुभव करून देते आहे. यामुळे लोकांना मृत्यूपूर्वी आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल, असा उद्देश यामागे होता. लोकांना अंगावर कफन टाकून सुमारे १० मिनिटे शवपेटीत झोपवले जाते. त्यांच्यावर अंत्यविधीची प्रक्रिया केली जाते. जर एखाद्या व्यक्तीला मृत्यूची जाणीवही झाली तर त्याचे वर्तन बदलते. तो चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागतो. तो इतरांबाबत सहानुभूतीने विचार करू लागतो. नुकत्याच झालेल्या अशा प्रकारच्या प्रयोगात १५ -७५ वर्षे वयोगटातील लोकांचा सहभाग होता. ७५ वर्षीय चो जे-ही म्हणाले, एकदा मृत्यूची जाणीव झाली आणि त्याचा अनुभव घेतला तर आयुष्यात आनंदी राहण्याचे पर्याय शोधू लागता. २०१२ मध्ये ह्योवोन हीलिंग सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात २५ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग होता.
एक विद्यार्थी म्हणाला, मी मित्रांना स्पर्धक म्हणून पाहतोय
२८ वर्षीय विद्यार्थी जिन-कुयू म्हणाला, मी इतरांना स्पर्धक म्हणून पाहात होतो. मी शवपेटीत असताना विचार केला, याचा उपयोग काय? एक दिवस मरायचेच आहे. आता मी नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्याचा विचार करतोय.
बेटर लाइफ इंडेक्समध्ये द. कोरिया ४० व्या क्रमांकावर
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट्सच्या ४० देशांतील सर्व्हेत दक्षिण कोरियाचा ३३ वा क्रमांक आहे. डॉक्टर प्रा. यू. एन. साइल यांनी म्हटले, कमी वयात मृत्यू जाणून घेणे त्याची तयारी करणे महत्वाचे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.