आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरियाची अण्वस्त्रे 'हिराेशिमा'पेक्षा 17 पट संहारक  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : उत्तर काेरियाने अलीकडे केलेली अण्वस्त्र चाचणी अतिशय भयंकर हाेती. १९४५ मध्ये जपानमधील हिराेशिमावर झालेल्या अणुबाॅम्ब हल्ल्याच्या १७ पटीने जास्त असे ते संहारक हाेते, असे इस्राे अर्थात भारतीय अंतराळ संशाेधन संस्थेच्या संशाेधकांनी म्हटले आहे.


के. एम. श्रीजित यांच्या नेतृत्वाखालील अहमदाबाद येथील संशाेधकांच्या चमूने याद्वारे जगाला सतर्कतेचा इशाराही दिला आहे. उत्तर काेरिया अण्वस्त्र प्रसारबंदीच्या करार २००३ मधून बाहेर पडले आहे. त्यानंतरही काेरियाने आपला चाचणी कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. ३ सप्टेंबर २०१७ मध्ये काेरियाने हायड्राेजन बाॅम्बची चाचणी केली. या चाचण्यांची उपग्रहाद्वारे परिणामकता


नाेंदवण्याचे काम संशाेधक रितेश अग्रवाल व संशाेधक ए. एस. राजावत यांनी केले. जिआेफिजिकल नियतकालिकात यासंबंधीचे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. या अभ्यासात त्यांनी भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर त्याचे मापन करणाऱ्या तंत्राचा वापरही केला. त्यासाठी इस्राेच्या संशाेधकांनी जपानच्या एएलआेएस-२ या उपग्रहाची देखील मदत घेतली. काेरियाने केलेल्या बाॅम्बचे वजन २४५ ते २७१ किलाे टन एवढे हाेते. १९४५ मध्ये हिराेशिमावर डागण्यात आलेल्या 'लिटल बाॅम्ब' १५ किला टनचा हाेता.


उपग्रहाच्या साह्याने चालवण्यात येणारे रडार पृथ्वीच्या पृष्ठभागावर झालेल्या काेणत्याही बदलाची नाेंद घेणारे अत्याधुनिक साधन आहे. त्याच्या साह्याने भूगर्भात हाेणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यांचे परिणामही माेजता येऊ शकतात, असे श्रीजित यांनी सांगितले. अातापर्यंत स्फाेटानंतर पृथ्वीवर हाेणाऱ्या भाैगाेलिक बदलांची डेटाअभावी अंतराळातून निगराणी करता येऊ शकलेली नाही.

पर्वताचा पृष्ठभागही हादरला
काेरियाच्या महाभयंकर स्फाेटानंतर माउंट मॅनटॅपच्या पृष्ठभागही हादरला. एवढेच नव्हे तर त्याची मूळ जागाही बदलली. यावरून काेरियाच्या बाॅम्बची संहारकता लक्षात येऊ शकते.

इन्सार तंत्राची मदत
जपानच्या उपग्रहाद्वारे आयएनएसएआर या तंत्राच्या साह्याने संशाेधकांनी महाभयंकर स्फाेटानंतर पृष्ठभागावर झालेल्या बदलांच्या नाेंदी घेतल्या. त्यातून मापनही करण्यात आले. सप्टेंबर २०१७ माउंट मॅनटॅप येथे उत्तर काेरियाने चाचणी घेतली हाेती. त्या साइटवरून इन्सारने अनेक प्रकारच्या रडार इमेजेसने एक नकाशा तयार केला.
 

बातम्या आणखी आहेत...