आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kota : 4 More Children Died; Infant Department Head Suspended, 85 Infants Died In Ahmedabad

आणखी 4 मुलांचा मृत्यू; शिशू विभागप्रमुखांची हकालपट्टी, अहमदाबाद येथील रुग्णालयात 85 बालकांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेटा/ राजकाेट / अहमदाबाद : राजस्थानच्या काेटा जिल्ह्यातील जे.के. लाेन रुग्णालयात गेल्या ३८ तासांत आणखी चार मुलांचा मृृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयात रविवार पर्यंत ३६ दिवसांत मृतांची संख्या ११० वर पाेहाेचली आहे. या प्रकरणी जे.के. लाेन रुग्णालयाच्या शिशु विभागाचे अध्यक्ष अमृतलाल बैरवा यांची पदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या जागी काेटा मेडिकल काॅलेजचे डाॅ. जगजित सिंह यांच्याकडे जबाबदारी साेपवण्यात आली आहे.

या िवभागात लवकरच आणखी चार डाॅक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री अशाेक गहलाेत यांचा गृह विभाग जाेधपूरच्या सरकारी रुग्णालयात डिसेंबर महिन्यात १४६ बालकांचा मृत्यू झाला. बिकानेरच्या सरकारी रुग्णालयात १६२, बाडमेर रुग्णालयात २९ बालकांचा मृत्यू झाला. 

राजस्थाननंतर आता गुजरातच्या राजकाेट व अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयांत बालकांच्या मृत्यूचा अहवाल समाेर आला आहे. राजकाेटच्या रुग्णालयात डिसेंबर महिन्यात १११ बालकांचा मृत्यू झाला. या तीन महिन्यांत आयसीयूमध्ये भरती झालेल्या एकूण २६९ बालकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी या हंगामात सुमारे १ हजार २३५ बालकांचा मृत्यू झाला हाेता. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात डिसेंबर महिन्यात ८५ बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधीक्षक जी.एस. राठाेड म्हणाले, डिसेंबर महिन्यात भरती झालेल्या शिशू मृत्यूदराच्या तुलनेत (२०१८) १८.६८ टक्के राहिले. २०१९ च्या डिसेंबरमध्ये २६५ जणांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात सुधारणा सुरू :

काेटाच्या जे.के. लाेन रुग्णालयात सुधारणांचे काम सुरू झाले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक सुरेश दुलारा म्हणाले, काचेच्या तुटलेल्या तावदानांची जागा आता पाॅली काॅर्बाेनेट शीटने घेतली आहे. एका खाेलीत दुरुस्ती करून बालकांसाठी खाटांची संख्या नऊ केली जाईल. त्याचे रुपांतर इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये केले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...