आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय-लेकीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला गेला नोकर, हातावरच ओरखड्यांमुळे पोहोचला तुरुंगात, 2 मर्डर करून लुटले होते 74 लाखांचे दागिने अन् 37 लाखांची रोकड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा (राजस्थान) - ज्वेलर राजेंद्र विजयवर्गीय यांच्या पत्नी गायत्री व मुलगी पलक यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लुटल्याचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली अहो. यात मास्टरमाइंड व मुख्य आरोपी घरातला जुना नोकरच निघाला. हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा म्हणजे आरोपींनी घरातून तब्बल एक कोटींची रोकड व दागिने लुटले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या ताब्यातून लुटण्यात आलेल्या 37 लाखांपैकी 21.70 लाख रुपये, 2 किलो 26 ग्रॅम सोने, साडे 13 किलोग्राम चांदीचे दागिने जप्त केले.

 

आयजी बिपिन कुमार पांडे म्हणाले की, मुख्य आरोपी मस्तराम ऊर्फ सल्लू मीणा (28) आणि लोकेश मीणा (20) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मस्तरामने दीड वर्षापूर्वी राजेंद्र विजय यांच्या येथे दुकानावर अडीच महिने चौकीदारी केली होती. यादरम्यान मस्तरामचे ज्वेलरच्या घरीसुद्धा येणे-जाणे होते. यामुळे त्याला कुटुंबीयांची दिनचर्यासहित बारीकसारीक माहिती होती. मस्तरामने रातोरात धनवान होण्यासाठी राजेंद्र यांना लुटण्याचा प्लॅन आखला. त्याने राजेंद्र यांच्या घर आणि दुकानाची रेकी केली होती. पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन्ही आरोपींना कोर्टापुढे हजर केले, तेथून त्यांना 9 फेब्रुपवारीपर्यँत कोठडी सुनावण्यात आली आहे.

केव्हा-कशी झाली हत्या: दुकानाची रेकी करून घरी गेले, चांदमल बाहेर पडताच घुसले घरात

एसपी दीपक भार्गव म्हणाले की, 31 जानेवारी रोजी मस्तराम आणि लोकेश दोघेही लोखंडी सळई घेऊन ज्वेलर राजेंद्र विजय यांच्या दुकानावर पोहोचले. तेथे दोघांनी दुकानाची पूर्ण रेकी केली आणि त्यांना राजेंद्र दुकानावर बसलेला दिसला. यानंतर दोन्ही गुंड राजेंद्र यांच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी राजेंद्र विजयचे वडील चांदमल घरातून बाहेर पडण्याची वाट पाहिली. मस्तरामला माहिती होते की, ज्वेलर राजेंद्र विजय दररोज 9 वाजेपर्यंत घरी पोहोचतात. तर, राजेंद्र यांचे वडील चांदमल संध्याकाळी 8 वाजता घरातून मंदिरात दर्शनासाठी जातात. चांदमल घरातून बाहेर पडताच दोघेही ज्वेलर राजेंद्र विजय यांच्या घरात शिरले आणि माय-लेकीची निर्घृण हत्या केली.

 

लूट केल्यानंतर खरेदी केले महागडे कपडे- मोबाइल...
एएसपी राजेश मिल म्हणाले की, मस्तरामने जवळजवळ 3 महिने चौकीदार म्हणून नोकरी केली आणि मर्जीने सोडून निघून गेला. दोघांचेही आधीपासून क्राइम रेकॉर्डही आहे. दोघेही 31 जानेवारी रोजी बाइकवरून राजेंद्रच्या घरी पोहोचले आणि हत्येनंतर बूंदी गावात गेले, तेथे दागिने व पैसे लपवले. मग 31 जानेवारी रोजी रात्रीच बूंदी बस स्टँडवर गेले आणि रोडवेज बसवरून जयपूरला निघून गेले. जयपूर बस स्टँडजवळ एका हॉटेलमध्ये थांबले आणि दुसऱ्या दिवशी भरपूर खरेदी केली, भरपेट दारूही प्यायले. दोघांनी महागडे मोबाइल, कपडे व इतर सामान खरेदी केले. 2 फेब्रुवारी रोजी ते परत कोटाला आले. कोटाला आल्यावर दोघांनी पुन्हा दारू ढोसली आणि अय्याशीमध्ये पैसे उडवायला सुरुवात केली.

 

मस्तरामने केली ही एक चूक: संशय येऊ नये म्हणून शोक व्यक्त करायला पोहोचला
मस्तराम दोन-दोन हत्या करून बेफिकीर होता. पोलिस व कुटुंबीयांना त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तो पीडित कुटुंबाकडे शोक व्यक्त करण्यासाठीही गेला. पोलिस पथक जागोजागी सतर्क होते. त्यांना त्याचे येथे येणे खटकले. कॉन्स्टेबल शिवराज यांना त्याचे हाव-भाव, हातापायावर ओरखडल्याच्या खुणांवरून संशय आला. कारण माय-लेकीने आरोपींशी दीर्घ संघर्ष केला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवल्यावर संशयाला बळकटी मिळाली. पोलिसांनी त्याला स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच तो मोडून पडला. मस्तरामने स्वत:च सगळा गुन्हा कबूल केला, नंतर पोलिसांनी दुसऱ्या साथीदारालाही ताब्यात घेतले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...