आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसले 5 लोक, CCTV तोडून बेडरूममध्ये झोपलेल्या आई आणि मुलीची केली हत्या, शेजाऱ्याने पाहिल्यावर झाला खुलासा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा(राजस्थान)- स्टेशन परिसरात गुरूवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून ज्वेलरची पत्नी आणि मुलीची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटा वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि घराबाहेर लोकांची गर्दी जमली. दोनपेक्षा जास्त हत्यारे असल्याचा संशय आहे, ज्यांनी डोक्यावर सुरीने वार करून त्यांची हत्या केली. हल्लेखोरांनी घरातील 5 सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचे डीव्हीआर तोडून निले. पोलिसांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हत्या झाल्याचा अंदाज वर्तवत आहेत, पण ज्वेलर राजेंद्र विजयवर्गीय सध्या मानसिक धक्यात असल्यामुळे ते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.


बेडरूममध्ये केली हत्या, मृतदेह फेकले हॉलमध्ये
राजेंद्र आणि त्यांच्या किरायदाराने सांगितले, रक्त बेडरूममध्ये पडले होते तर मृतदहे हॉलमध्ये पडले होते. घटनास्थळ पाहून असे वाटते की, आरोपींनी दोघींना बेडरूममध्ये मारले आणि हॉलमध्ये ओढून आणले. कुटुंबींयानी सांगितले की, आरोपींनी बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडले आङे. त्यात पैसे आणि दागिने ठेवलेले होते. 


आजोबा घरी आल्यावर घटनेचा खुलासा झाला
ही घटना रात्री अंदाजे 8-8.30 वाजता घडली असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयजी बिपिन कुमार पांडेय, एसपी दीपक भार्गव सहित मोठे पोलिस आधिकारी घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी सांगितले की, स्टेशनसमोरील जैन मंदिरजवळ ज्वेलर राजेंद्र विजयवर्गीय यांचे घर आहे. घटना घडली तेव्हा राजेंद्र दुकानावर होते. घरात मुलगी पलक(18) आणि पत्नी गायत्री(45) या दोघीच होत्या. राजेंद्र यांचे वडील चांदमल हेदेखील बाहेर गेले होते. चांदमल घरी परतले तेव्हा घटनेचा खुलासा झाला.


ओळखीच्या व्यक्तीवर संशय
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी सांगितले की, घरात 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. घरात कोणी वर येत असे तेव्हा गायत्री किंवा मुले कॅमेरात पाहूनच गेट उघडत होते. त्यामुळे हे कोण्या ओळखीच्या व्यक्तीचे काम असल्याचे बोलले जात आहे.


घराची संपूर्ण माहिती होती 
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपींना घराची खडा ना खडा माहिती होती. त्यांनी घरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि हार्ड डिस्कपण घेऊन गेले. त्यांनी इतर रूममध्ये काहीच केले नाही, आणि फक्त तीच आलमारी तोडली ज्यात पैसे आणि दागिने होते. 


व्याजामुळे झालेला वाद
स्थानिक लोकांचे म्हणने आहे की, राजेंद्रने अनेक लोकांना व्याजाने पैसे दिले होते. त्यामुळे घटनेच्या मागे ओळखीचा व्यक्ती असल्याचा दाट संशय आहे. 

 

कॉलोनीला घेरा घालून सीसीटीव्ही फूटेज चेकींग सुरू
पोलिसांनी स्टेशन परिसरातील आणि जैन मंदिराजवळील बिल्डींगमध्ये लागलेले सगळे सीसीटीव्ही फूटेज चेक करायला सुरूवात केली आहे. पोलिसांना हेदेखील कळाले नाहीये की, आरोपी किती होते आणि कोणत्या गाडीतून आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...