आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुर्डुवाडी- जिल्हाप्रमुख पदावरून धनंजय डिकोळे यांना बाजूला काढले असले तरी लवकरच त्यांना नवीन पद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावना शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे काळवण्यात येतील. शिवाय त्यांच्याबरोबर पक्ष प्रमुखांकडे येण्याची तयारी असल्याचेही सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी सांगितले.
कुर्डुवाडी नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्ये महेश कोठे, मुंबईचे बाबूराव गोमे यांनी धनंजय डिकोळे यांची भेट घेतली. त्यांची बंद खोलीमध्ये एक तास चर्चा झाली. या वेळी शिवसेना गट नेते बबन बागल, नगरसेवक संजय गोरे, शहरप्रमुख कुमार गव्हाणे, शिवाजी गवळी, हरिभाऊ बागल, संतोष शेंडे, राजेंद्र पारखे, दिलीप सोनवर, आकाश गव्हाणे, पिंटू सोनवर उपस्थित होते. या वेळी 'दिव्य मराठी'शी संवाद साधताना कोठे म्हणाले, काम करणारे बाजूला गेले तर पक्ष अडचणीत येण्याची शक्यता असते. हे अापल्याला समजते मग वरिष्ठांना समजत नाही, असे नसते. डिकोळे, नगराध्यक्ष, नगरसेवक इतर पदाधिकारी शिवसेनेचे काम करत राहतील. रागाच्या भरामध्ये चुका झाल्यास याचा फटका अापल्याला बसतोच.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदीर समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबात मंुबई येथे ५ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत चर्चा होईल. नूतन जिल्हा प्रमुखांना त्यांच्या पध्दतीने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. धनंजय डिकोळे म्हणाले, शिवसेनेमुळे आमची ओळख आहे. मला पद मिळावे, अशी अपेक्षा नाही. शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार आहे. मात्र जिल्ह्यामध्ये सावंत यांनी गोंधळ घालण्याचे काम सुरू केले आहे, ते वरिष्ठांच्या कानावर घातले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.