आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार, चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार मा. चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आशिष कांटे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन, तसेच विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी श्री. आशिष कांटे यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील श्री. कांटे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देत पक्षात स्वागत केले.

कांटे यांच्या पक्ष प्रवेशाबद़दल बोलताना श्री. पाटील म्हणाले की, "देशाचे लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन अनेक तरुण भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यानुसार आशिष कांटे यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पक्षात स्वागत करतो."

बातम्या आणखी आहेत...