आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्याने कोथरुडकर नाराज; नोटाला मतदान करण्याचे फलक ठिकठिकाणी झळकावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत 52 विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी देण्यात आली तर 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या 12 आमदारांमध्ये कोथरुडच्या मेघा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. दरम्यान भाजपने मेघा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघातून नाराजी वर्तवण्यात येत आहे. 
 

ठिकठिकाणी झळकावले फलक 
कोथरूड मतदार संघातून भाजपने मेघा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराजीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी 100% टक्के नोटा (NOTA) ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी 100% नोटाला मतदान असे काळ्या रंगावर फलट झळकवण्यात आले आहेत.