आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. घड्याळाच्या तीन काट्यांत आणि परिवारात काही साम्य जाणवले.घड्याळात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा मुल असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची गती आहे. गती वेगळी पण दिशा एक. प्रत्येकाच्या गतीचे वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे आणि तास पूर्णत्वास येत नाही. परिवारात वडील म्हणजे तास काट्याची  गती सगळ्यात कमी. तरीही तो ठाम गतीने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. वडीलही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ठामपणे प्रवास करत असतात. आई म्हणजे मिनिट काटा असते. प्रत्येक मिनिटाला तिची गती जाणवत असते. ती सतत कार्यमग्न असते. सेकंद काटा म्हणजे मलं. ती तास आणि मिनिट काटा यांच्या मधेच धडपडताना दिसतात. घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच कुटुंबाचे आहे. कुटुंबातील वडील, आई, मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्या शिवाय घराला पूर्णत्व येत नाही. पण हे काटे चौकट सोडत नाहीत हे विशेष. कुटुंबाची ही चौकट  सांभाळण्याची जबाबदारी कुटूंबातल्या प्रत्येकाचीच...