आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका चालली नाही, मात्र मला वैयक्तिकरीत्या योगाचा फायदा झाला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरण जैन : मुंबई
गेल्या काही वर्षात टीव्हीवर ‘नागिन’ आणि ‘डायन’ सारख्या मालिकांचा ट्रेंड सुरू झाला आहे. प्रत्येक वाहिनीवर अलौकिक शक्तीवर आधारित एखादी तरी मालिका दिसतेच. लाेकांनादेखील या मालिका आवडतात. मात्र अभिनेता क्रांती प्रकाश झा या मालिकेत कधीच काम करू इच्छित नाही. क्रांती प्रकाश  ‘बाटला हाउस’, ‘एम.एस.धोनी’ सारख्या िचत्रपटात झळकला आहे. शिवाय ‘स्वामी रामदेव’ मालिकाही करत आहे. या अलौकिक शक्तीवर आधारित मालिकेविषयी तो म्हणतो...,

अलौकिक शक्तीवर आधारित मालिका करू शकत नाही : सध्या टीव्ही इंडस्ट्रीत विविध प्रकारच्या संकल्पनांवर मालिका येत आहेत. त्या मला आवडतातही. मात्र अलौकिक शक्तीवर आधारित मालिकांत मी काम करू शकत नाही. कारण मला त्या आवडतच नाहीत. कारण त्या खूपच नाटकीय पद्धतीने दाखवल्या जातात. ‘नागिन’ आणि ‘डायन’सारख्या मालिका करणे माझ्या तत्त्वात बसत नाहीत.

बाबा रामदेव मालिकेमुळे खऱ्या आयुष्यात फायदा झाला
बाबा रामदेव ही माझी पहिली मालिका होती.  चांगले प्रमोशन करूनही तिला चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे मी निराश होतो, मात्र मला बाबा रामदेव यांना भेटण्याची संधी मिळाली. हरिद्वारमध्ये त्यांच्या आश्रमात राहण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत मी सकाळी योग करायचो, त्यांच्याकडून योग बरीच योगासने शिकलो. मी उच्चस्तरीय योगा िशकू शकतो, असा विचारही मी केला नव्हता. मालिका चालली नाही, मात्र मला वैयक्तिकरीत्या खूप फायदा झाला.

प्रेक्षकांची नाडी ओळखायला हवी...
टीव्हीवर काम करण्याविषयी क्रांती म्हणतो..., टीव्ही प्रेक्षकांची नाडी ओळखायला हवी, त्यांना गांभीर्याने घ्यायला हवे, असे मला वाटते. आज टीव्हीवर त्यांना खिळवून ठेवण्यासाठी एका चांगल्या कथेची गरज आहे. प्रेक्षक पाहीलच असे तुम्ही स्वत:च ठरवून काहीही दाखवू शकत नाही किंवा त्यांच्यावर काहीही थोपवू शकत नाही.

टीव्हीवर काम करायला तयार आहे...
मी पुन्हा टीव्हीवर काम करायला तयार आहे. हे एक मोठे माध्यम आहे. याला आपण नाकारू शकत नाही. शाहरुख खान पासून ते अमिताभ बच्चन आणि सलमान खानपर्यंत प्रत्येकजण टीव्हीवर काम करत आहे. एक बटण दाबताच तुम्ही प्रत्येक घरात जाता, आज अनेक टीव्ही कलावंतदेखील बॉलीवूडमध्ये काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...