आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांती रेडकरवरुन हटणार नाही तुमची नजर, लवकरच घेऊ येत आहे काही तरी एक्साइटिंग!   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः क्रांती रेडकरने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. पण सध्या क्रांती मोठ्या पडद्यापासून दूर कुटुंबात रमली आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतेच क्रांतीने तिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन ती आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबरदेखील घेऊन आली आहे. मरुन कलरच्या साडीत क्रांती अतिशय सुंदर दिसत आहे. साजेसा मेकअप, केसांचा पाडलेला अंबाडा आणि कानात मोठे इअररिंग्स घालून तिने लूक कम्प्लिट केला आहे.


साडीतील हे फोटो शेअर करुन क्रांतीने Shot for something really exciting and enriching .. will update soon असे कॅप्शन दिले आहे. सोबतच झी युवा आणि झीमराठीऑफिशिअल हे हॅशटॅग दिले आहेत.  पण क्रांतीने ती नेमके कसले शूटिंग करत आहे, याचा उलगडा केलेला नाही. म्हणजेच क्रांतीने झी युवाच्या एखाद्या मालिकेसाठी शूटिंग करत असल्याचा यावरुन अंदाज येतोय. ब-याच कालावधीनंतर क्रांतीला छोट्या पडद्यावर बघण्यास नक्कीच तिचे चाहते उत्सुक असणार आहेत, हे काही वेगळे सांगायला नको. 

जुळ्या मुलींची आहे आई... 
‘जत्रा’ चित्रपटापासून क्रांतीला खरी लोकप्रियता मिळाली. चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलेले आहे. क्रांतीने 29 मार्च 2017 ला समीर वानखेडे या आयपीएस अधिकाऱ्याशी लग्न केले. तिने लग्नाविषयी खूपच गुप्तता पाळली होती. तिच्या लग्नात जवळचे काही मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते.  लग्नानंतर ती संसारात रमली. गेल्याच वर्षी तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.

अभिनयाव्यतिरिक्त करते आहे हे काम... 
क्रांती आता स्वतःचा साईड बिजनेससुद्धा करत आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच आपल्या ब्रँडचे उदघाटन केले. तिने स्वतःचे फॅशन ब्रँड लाँच केले आहे. तिच्या ह्या क्लोथिंग ब्रँडचे नाव ‘ZZ झिया झायदा’ आहे. क्रांतीने ब्रँडचे नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. ‘zz झिया झायदा’ नावाशी तिचे खास कनेक्श