आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Krishna Abhishek Celebrates Twins Babies Birthday, Tusshar And Many Celebs Joined The Party With There Children

कृष्णा अभिषेकने साजरा केला जुळ्या मुलांचा वाढदिवस, तुषारसह अनेक सेलेब्स आपल्या मुलांसमवेत पोहोचले  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाहने आपल्या जुळ्या मुलांनाच दुसरा बर्थडे सेलिब्रेट केला. कपलने मुलगा रयान आणि कृषांकच्या बर्थडेला ग्रँड पार्टी दिली. या पार्टीमध्ये टीव्हीमधील अनेक सेलेब्स आपल्या मुलांसोबत पोहोचले होते.  

 

कपिल शर्मा सोडून पोहोचली संपूर्ण टीम... 
पार्टीमध्ये करण मेहरा आपली पत्नी निशा रावल आणि मुलगा कविशसोबत स्पॉट झाला. याव्यतिरिक्त 'द कपिल शर्मा शो'मधील अनेक आर्टिस्ट जसे की, राजीव निगम, चन्दन प्रभाकर, कीकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, अर्चना पूरन सिंह तिचा पती परमीत सेठी, रोशेल राव आणि तिचा पती कीथ सिक्वेरा पार्टीमध्ये दिसले.  

 

मामा गोविंदा होते गायब... 
कृष्णाची बहीण आरती सिंहदेखील मुलांसोबत खूप एन्जॉय करताना दिसली. अभिनेता तुषार कपूर आपला मुलगा लक्ष्यसोबत या पार्टीमध्ये सामील झाला. मात्र तो लवकरच पार्टीमधून चालल्या गेला. मागच्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी कृष्णा अभिषेकचे मामा-मामी गोविंदा आणि सुनीता बर्थडे सेलिब्रेशनमध्ये दिसले नाही. गोविंदा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्या नात्यात मागच्यावर्षीपासूनच काहीतरी तणाव निर्माण झाला आहे. 

 

कृष्णा आणि कश्मीरा 2017 मध्ये जुळ्या मुलांचे पेरेंट्स बनले होते, मुलांचा जन्म सरोगसीद्वाराव झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...