आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्ण जन्माष्टमी : बासरी ते सुदर्शन चक्र...श्रीकृष्णासोबत जीवनभर होत्या या 6 भेटवस्तू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्णाला पिता, सखी आणि गुरूकडून मिळालेल्या भेटवस्तू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडल्या गेल्या. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना अशा 6 वस्तू मिळाल्या होत्या. यात काही अगदी नगण्य होत्या. मात्र, श्रीकृष्णाने त्या शेवटपर्यंत सांभाळल्या. 

बासरी : नंद यांनी गोकुळात श्रीकृष्णाला वयाच्या चौथ्या वर्षी बासरी दिली. ती कृष्णासाठी प्राणप्रिय होती. हीच बासरी श्रीकृष्णाची जीवनभर साथीदार राहिली. 

वैजयंती माळ : श्रीकृष्णाने आठ-दहा वर्षांचे असताना पहिल्यांदा रासलीला खेळली तेव्हा राधेने त्यांना वैजयंती माळ घातली होती. वैजयंती माळ म्हणजे विजय देणारी माळ... 

मोरपंख : श्रीकृष्ण आठ-दहा वर्षांचे होते तेव्हा रासलीलेसाठी वृंदावनात गेले. येथेच राधेने त्यांच्या मुकुटावर मोरपंख लावले होते. श्रीकृष्णाने या मोरपंखाला कायम आपल्या मस्तकावर स्थान दिले. 

अजितंजय धनुष्य, पांचजन्य शंख -  श्रीकृष्ण ११-१२ वर्षांचे असताना उज्जैनमध्ये गुरू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात धडे गिरवत होते. तेव्हा गुरुपुत्र दत्त याचे शंखासुराने अपहरण केले. श्रीकृष्णाने त्याची सुटका केली म्हणून गुरूंनी त्यांना अजितंजय धनुष्य भेट दिले. शंखासुराच्या वधानंतर श्रीकृष्णाला जो शंख मिळाला त्याला सांदिपनी ऋषींनी पांचजन्य नाव दिले. 

सुदर्शन चक्र : श्रीकृष्ण १२-१३ वर्षांचे असताना परशुरामांची भेट घेण्यासाठी जानापाव (इंदूर) येथे गेले होते. तेथे परशुरामांनी भेट म्हणून श्रीकृष्णास सुदर्शन चक्र दिले. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते. हे सुदर्शन चक्र कायम कृष्णाकडे राहिले. 

स्रोत : युगंधर (शिवाजी सावंत), श्रीकृष्ण लीला (वनमाळी)

बातम्या आणखी आहेत...