• Home
  • Gossip
  • Krishna Janmashtami : Shah Rukh Khan broke Dahihandi, his video while celebrating Janmashtami goes viral

Bollywood / कृष्ण जन्माष्टमी : शाहरुख खानने फोडली दहीहंडी, शाहरुखचा जन्माष्टमी साजरा करतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल  

किंग खानने आपल्या स्टाफसोबत साजरी आलेली दहीहंडी

दिव्य मराठी वेब

Aug 24,2019 06:54:20 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा दिवस. या दिवसाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी अनेक नवे आहेत. याचदिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. अनेक राज्यांमध्ये जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून त्यातील दही आणि लोणी सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जाते. जन्माष्टमीच्या या विशेष प्रसंगी शाहरुख खाननेदेखील मन्नतजवळ दहीहंडी साजरी केली.

#HappyJanmashtami2019 ❤️

A post shared by SRK Universe (@srkuniverse) on

अशातच शाहरुख खानच्या फॅनपेजने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये किंग खान आपल्या स्टाफसोबत दहीहंडी साजरी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान आपल्या सिक्युरिटी गार्डच्या खांद्यावर चढून लोणी आणि दह्याने भरलेली हंडी फोडताना दिसत आहे.

X
COMMENT