आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Krishna Janmashtami : These Are The Most Popular Kanha On The Small Screen

कृष्ण जन्माष्टमी : हे आहेत छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कान्हा, जाणून घ्या सध्या काय करतात...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुमेध मुद्गलकर सध्या स्टार भारतवर प्रसारित होत असलेल्या 'राधा-कृष्ण' या टीव्ही शोमध्ये कृष्णाची भूमिका साकारत आहे. हा शो 2018 मध्ये सुरु झाला होता. कृष्णच्या भूमिकेत सुमेधला खूप पसंती मिळत आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा दिवस. या दिवसाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी अनेक नवे आहेत. याचदिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. असे म्हणतात श्रीकृष्णाचे रूप खूपच लोभस आणि मोहक होते. त्यांच्या बासुरीतील स्वर प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करायचे आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणजे सर्वांचाच लाडका देव. अगदी लहान बालकापउन ते अबालवृद्धांपर्यंत सर्वच जणांना तो खूप भावतो. आता या खऱ्या श्रीकृष्णाचे दर्शन तर आपल्याला घडू शकले नाही पण आपल्या भोवती असे अनेक कृष्ण आहेत. जे आपल्याला आवडतात. आज पाहुयात टीव्हीतील अशाच काही कृष्णांविषयीची माहिती...