आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बुंदेलखंडचे 'दशरथ मांझी'; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी 4 वर्षांत खोदला अडीच एकर तलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हमीरपूर - उत्तर प्रदेश सरकारने मोठ-मोठे प्रकल्प उभारूनही बुंदेलखंडमधील दुष्काळाची समस्या मिटली नाही. एका वृद्धाने कठोर परिश्रम घेत एका गावाच्या पाण्याची अडचण सोडवली आहे. यामुळे हमीपूरच्या पचखुरा गावातील ग्रामस्थांना यावर्षी भीषण दुष्काळातही पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. येथील 60 वर्षीय कृष्णानंद बाबाने 4 वर्षांत एकट्याच्या प्रयत्नाने अडीच एकरच्या तलावाची 12 फूट खोली वाढवत त्याला पुनर्जीवित केले. सध्या तलावात मुबलक पाणी आहे. कृष्णानंदच्या या कार्यामुळे लोक त्यांना बुंदेलखंडचा दशरथ मांझी म्हणू लागले आहेत. 


2015 मध्ये सुरु केले खोदकाम

बुंदेलखंडमध्ये दरवर्षी नद्या आणि तलाव कोरडेठाक पडतात. पाण्याच्या एका थेंबासाठी लोकांना भटकावे लागते. या समस्येवर अनेक योजना आखल्या जातात पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. कृष्णानंद यांनी 2015 मध्ये दुष्काळाशी दोन हात करण्याचा दृढनिश्चय केला. गावातील चंदेलकालीन तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. गाळ साचल्यामुळे तलावात पाणी साचत नव्हते. यामुळे कृष्णानंदने तलावाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. 


कृष्णानंदने तलावाचे काम हाती घेतले तेव्हा त्याची खोली 5 फूट देखील नव्हती. ते एकट्याने तलावाचे खोदकाम करत त्यातील गाळ काढत होते. त्यांचा हे काम पाहून गावातील लोक त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवत. 4 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर कृष्णानंदने तलावातील पूर्ण करत तलावाची खोली 12 फूट केली. हा तलाव मदतीसाठी न आलेल्या लोकांची आज तहान भागवत आहे. 


प्रशासनाने केले होते दुर्लक्ष 
सरकार मनरेगाअंतर्गत तलावांचे खोदकाम करते. हे काम करणाऱ्या मजुरांना 250 प्रति दिन हिशोबाने मजुरी देण्यात येते. पण कृष्णानंद यांनी कोणाचीही मदत न घेता सतत चार वर्ष या तलावाचे खोदकाम केले. एवढेच नाही तर त्यांनी तलावाचे नूतनीकरण केले असून आसपास वृक्षारोपण केले आहे. या वृक्षांची ते स्वतः काळजी घेतात. 


कोण आहेत कृष्णानंद?
कृष्णानंद यांचे खरे नाव किशन पाल सिंह आहे. माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतरते 1982 मध्ये हरिद्वारला गेले. तेथे स्वामी परमानंद यांचे शिष्य बनून किशन पाल सिंहचे कृष्णानंद झाले. स्वामींच्या निधनानंतर कृष्णानंद बुलंदशहर जिल्ह्यातील भाईपूर गावी आले आणि तेथे 13 वर्षांत परमानंद महाविद्यालयाची स्थापना केली. 2014 साली महाविद्यालयाच्या कारभार इतरांवर सोपवत ते पचखुरा येथे आपल्या गावी गेले. गावातील 200 वर्ष जुने असलेले रामजानकी मंदिर हे त्यांचे निवासस्थान आहे. येथे पूजा-पाठ करून आपले जीवन जगत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...