आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिती खरबंदा पुलकित सम्राटला करतेय डेट, स्वतः दिली कबुली, सलमान खानच्या बहिणीचा आहे एक्स-हसबंड 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'शादी में जरुर आना' आणि ‘हाऊसफुल्ल 4’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री क्रिती खरबंदा अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळात सुरु होत्या. या सर्व चर्चा खऱ्या असल्याचा खुलासा स्वत: क्रितीने केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण पुलकितला डेट करत असल्याची माहिती दिली.

सर्वप्रथम आईवडिलांना सांगू इच्छित होती क्रिती... 
मुलाखतीत क्रिती म्हणाली, आमच्या रिलेशनशिपविषयी प्रामाणिकपणे मला सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना सांगायचे होते. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळेची गरज असते. कधी कधी एखाद्या गोष्टीला पाच वर्षे लागतात, तर कधी पाच महिने. आमच्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले आहेत. माझ्या या नात्याविषयी आता कुणालाही सांगायला मला भीती वाटत नाही, याबद्दल मी समाधानी आहे.  

असे जुळले सूत.. 
पुलकित आणि क्रिती यांनी ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये खुप छान मैत्री झाली. त्यानंतर ‘पागलपंती’ या आगामी चित्रपटात दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी खुप वेळ एकत्र व्यतित केला. दोघे एकाच जीममध्ये एकाच ट्रेनरकडे वर्क आउट करायचे. तसेच ते लंडनमध्ये एकाच रेसीडेंशल कॉम्प्लेक्समध्ये राहात होते. त्याचवेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...