आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटम नंबर 'आओ कभी हवेली पे' वर थिरकणार कृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी अभिनय केलेल्या 'स्त्री' चित्रपटातील गाणे 'कमरिया' नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्यात नोरा फतेहीने पाहुण्या कलावंतांची भूमिका केली आहे. आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित होणार आहे. त्यात कृती सेनन दिसेल. सचिन-जिगरच्या संगीताने सजलेल्या गाण्याचे बोल आहेत... 'आओ कभी हवेली पे'. यात रैपर बादशाहने आवाज दिला आहे. या गाण्याच्या माध्यमातून कृती पहिल्यांदाच चित्रपटात आयटम नंबर करणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आठवडाभर आधी हे गाणे लाँच करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. चित्रपटाच्या शेवटी हे गाणे दाखवले जाईल. कृतीदेखील या आयटम साँगमुळे खुश आहे. वेगळे करण्याची इच्छा होती, असे ती म्हणाली. 

बातम्या आणखी आहेत...